घरताज्या घडामोडीLive Updates : अंधेरीनंतर आता खारमध्येही जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया

Live Updates : अंधेरीनंतर आता खारमध्येही जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया

Subscribe

अंधेरीनंतर आता खारमध्येही जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया

वांद्रे पश्चिमेकडील पार्ले हिल जलाशय इंलेट येथे 600 मिमी व्यासाची भूमिगत जलवाहिनी आज रात्री फुटली. पालिका जल अभियंता खात्याच्या टीमने शुक्रवारी सकाळी जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खार (पश्चिम) विभागातील दांडा कोळीवाडा, डॉ. आंबेडकर रोड परिसरातील पाणी पुरवठ्यावर आणखीन विपरीत परिणाम होणार आहे.

- Advertisement -

जुने सहकारी नवाब मलिका त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आम्ही भेटलो – सुनील तटकरे

नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमची भेट झाली. आम्ही त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. आज विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकार्‍यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणे स्वाभाविक आहे.

- Advertisement -

आमच्याकडून नवाब मलिकांचा सन्मान होईल – सुप्रिया सुळे

नवाब मलिक यांना विरोध करणारे पत्र समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, नवाब मलिक हे फक्त राष्ट्रवादीचे नाही तर महाराष्ट्राचे नेते आहेत. भाजपाच्या विरोधात ते अनेकदा ताकदीने लढले आहेत. त्यामुळे आमच्याकडून नवाब मलिक यांचा सन्मान होईल. माझ्यासाठी ते आमच्या कुटुंबातील भाऊ आहेत. त्यांच्यावरील आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिल असेल तर दुर्दैवी आहे. महाराष्ट्रच राजकारण खालच्या पातळीवर गेल आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.


नवाब मलिकांच्या सहभागावरून देवेंद्र फडणवीस यांचे अजित पवारांना पत्र


लोकसभेत सर्व खासदारांना हजर राहण्यासाठी भाजपाकडून व्हीप जारी

उध्या लोकसभेत अत्यंत महत्त्वाच्या कायदेविषयक कामकाजावर चर्चा करण्यासाठी भाजपाने आपल्या सर्व लोकसभा खासदारांना 8 डिसेंबर रोजी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी एका ओळीचा व्हीप जारी केला आहे.


अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा

रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 7 हजार जणांना आमंत्रण

सचिन-विराट ते अंबानी अशा एकूण 7,000 जणांना आमंत्रण


11 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार शिंदे गट आमदारांची साक्ष

पहिली उलटतपासणी दिलीप लांडे यांची होणार

ठाकरे गटाचे वकील देवत्त कामतांकडून उलटतपासणी होणार


शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर सुनावणीला सुरुवात

शिंदे गटाच्या आमदारांची उलट साक्ष नोंदवली जाणार


विधानपरिषद आमदार अपात्रतेप्रकरणी ठाकरे गट हायकोर्टात जाणार


शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दुपारी 2.30 वाजता सुनावणी होणार


तेलंगणात काँग्रेस सरकारचा शपथविधी सोहळा सुरू

रेवंत रेड्डी तेलंगणाच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 2 तासांचा ट्राफिक ब्लॉक

मुंबईच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक पूर्णपणे बंद
खंडाळा हद्दीत गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी ब्लॉक


अधिवेशनादरम्यान आमदार अपात्रतेवरही याचिकेवर सुनावणी घेणार – राहुल नार्वेकर


राष्ट्रवादीच्या कार्यालयावरून वाद;जितेंद्र आव्हडांच्या नावाची पाटी काढली


विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरातून सुरुवात होणार

अधिवेशनात सरकार 9 विधेयक मांडणार

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -