घरदेश-विदेशLive Update : संजय राऊत यांच्यावर यवतमाळमध्ये गुन्हा दाखल

Live Update : संजय राऊत यांच्यावर यवतमाळमध्ये गुन्हा दाखल

Subscribe

संजय राऊत यांच्यावर यवतमाळमध्ये गुन्हा दाखल

पंतप्रधान मोदींची बदनामी केल्याप्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडमध्ये गुन्हा दाखल

- Advertisement -

मनोज जरांगे पाटील यांची तबेत खालावली

अंबाजोगाई येथील रुग्णालयात जरांगेवर उपचार सुरू

- Advertisement -

भारतीय नौदलाच्या बिटिंग रिट्रिट सोहळ्याला सुरुवात

बिटिंग रिट्रिट सोहळ्यात नौसैनिकांकडून विविध प्रकारच्या कसरती


माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या समर्थकावर गोळीबार, युवकाचा मृत्यू

जालन्यात अर्जुन खोतकर यांच्या खंदे समर्थकावर गोळीबार करण्यात आला.

या घटनेत गजानन तौर या युवकाचा मृत्यू झाला. शहरातील मंठा चौफुली या भागात ही घटना घडली. अज्ञात बंदूकधाऱ्याने गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली


CM Eknath Shinde on 370
सर्वोच्च न्यायालयाने लोकांच्या मनातील निर्णय दिला आहे. त्यासाठी मी न्यायालयाला धन्यवाद देतो.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा हा विजय आहे.
बाळासाहेब ठाकरे म्हणायचे मला एक दिवस देशाचा पंतप्रधान करा, मी कलम 370 हटवतो.
सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते, अखंड हिंदूस्थान, ते पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. मोदींची गॅरंटी ही मोठी आहे.


मख्यमंत्री एकनाथ शिंदे On Thackeray Sena
बीच कॉम्बर होता. दगड गोटे, प्लॅस्टिक हे त्या बीच कॉम्बरच्या जाळीमध्ये अडकते आणि त्याचे वर्गीकरण होते. त्यानंतर बीचवर स्वच्छता होते, आणि लोकांना चालण्यासाठी फक्त वाळू राहते.
बोलणाऱ्यांनी पहिले माहिती घ्यायला पाहिजे.
ज्यांनी मुंबईच्या विकासावर बुल्डोझर फिरवला त्यांना काय कळणार?
महाराष्ट्राला विचारतो, तुम्हाला घरी बसणारा मुख्यमंत्री पाहिजे, तुम्हाला दिल्ली ते गल्ली बीचवर कॉम्बर चालवणारा मुख्यमंत्री पाहिजे.


मख्यमंत्री एकनाथ शिंदे on Nana Patole
हे सरकार फडतूस आहे की महायुती फडतूस आहे की आघाडी फडतूस आहे हे या देशाच्या जनतेने तीन विधानसभेच्या निकालातून दाखवले आहे. त्यांना आम्हाला फडतूस म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही


मख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑन उद्धव ठाकरेसरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभे आहे. १२ हजार कोटींची मदत सरकारने शेतकऱ्यांना केली आहे. मी आणि फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो. धानाच्या नुकसानीची पाहणी केली. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, जे १४ दिवसानंतर अधिवेशनाकडे आले ते किती गंभीर आहे, याचं त्यांनी आत्मचिंतन करावे.


उद्धव ठाकरेंचा आरोप आहे आमदार गुंडगिरी करत आहे.
जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा पत्रकारांना जेलमध्ये टाकण्याचे काम कोणी केले
नवनीत राणा आणि रवी राणा यांना यांना
केंद्रीय मंत्री राणे यांना जेवण करत असताना पोलिसांनी ताब्यात घेण्याचे काम कोणी केले?
कोण संजय राऊत? शीतल म्हात्रे उत्तर देतील.


मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

8 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मध्य प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा


NIA ने सकीब नाचन परदेशातील तीन हँडलर्सच्या संपर्कात

NIA च्या तपासात धक्कादायक माहिती


मविआतील जागावाटपाबाबत 19 डिसेंबरला दिल्लीत बैठक

लोकसभा जागावाटपावर शरद पवारांची वेट अँड वॉचची भूमिका

नाशिक लोकशबा मतदारसंघाबाबत ठाकरे गट गटाचा दावा पवारांचा खोडला


देशभरात डेंग्यूच्या रूग्णांची संख्या वाढली

डेंग्यूच्या रूग्णसंख्येत महाराष्ट्र तिरऱ्या क्रमांकावर

डेंग्यूच्या रूग्णांच्या बाबती उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे, तर बिहार दुसऱ्या क्रामांकावर


रस्त्यांची दुरवस्था असतानाही टोलवसुली सुरू असल्याची कबुली

राठ ठाकरे यांच्या भूमिकेला राज्य सरकारची सहमीत

2026 पर्यंत टोलद्वारे 33 कोटी वसूल होणार


कलम 370 रद्द करण्याचा निर्णय वैध -सर्वोच्च न्यायालय

 


भाजपाची प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी नक्की भूमिका काय? – संजय राऊत

प्रफुल्ल पटेली यांच्याविषयी भूमिका अजूनपर्यंत स्पष्ट केली नाही. भाजजा आणि फडणवीस फसले आहेत, असे संजय राऊत म्हणाले.


शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणी पुन्हा दुपारी अडीच वाजात सुरू होणार


आदित्य ठाकरे यांची अधिनेशनाला हजेरी


पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-विरार दरम्यान 25-30 अतिरिक्त लोकल धावणार

गोरेगाव ते बोरिवली दरम्यान सहावी मार्गिका टाकली जात आहे. या मार्गिकेचे काम एप्रिल ते मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे.

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-विरार दरम्यान 25-30 अतिरिक्त लोकल चालवणे शक्य होणार आहे.


कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील शेतकरी आक्रमक झाला आहे. शरद पवार देखील या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आज रास्ता रोको आंदोलन करणार आहे.


Nagpur : काँग्रेसचा आज नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा

सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा भव्य ‘हल्लाबोल’ मोर्चा आज (ता. ११ डिसेंबर) नागपूर विधानभवनावर धडकणार आहे.

विदर्भातील नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.


मालेगावात योगिता अपूर्व हिरेंवर गुन्हा दाखल

250 पोती तांदळाची काळ्याबाजारात विक्री केल्याचा आरोप

पोषण आहारासाठी असलेल्या तांदळाची विक्री


मुंबईच्या बोरीवली येथे ट्रकला भीषण आग

देवीपाडा मेट्रो स्टेशनजवळ डिव्हायडरला धडक

सुदैवाने जीवितहानी नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -