घरट्रेंडिंगलम्पीमुळे पशुधनही 'लॉकडाऊन'; दूग्धव्यवसायावर परिणाम

लम्पीमुळे पशुधनही ‘लॉकडाऊन’; दूग्धव्यवसायावर परिणाम

Subscribe

नाशिक : राजस्थानपाठोपाठ महाराष्ट्रातही लम्पी या संसर्गजन्य आजारामुळे राज्यातील पशुधन लॉकडाऊन झाले आहे. परिणामी जनावरांचे बाजार आणि वाहतुकही ठप्प झाली आहे. याशिवाय राज्यभरातील दूग्धव्यवसायावरही परिणाम झाला आहे.

राजस्थान आणि आसपासच्या भागात धुमाकूळ घालणार्‍या या आजाराने आता देशाची राजधानी दिल्लीतही थैमान घातले आहे. दिल्लीत या आजाराची 173 जनावरांना लागण झाली आहे. एकाही प्राण्याच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. गुरांना लस देण्यासाठी दिल्ली सरकार गोट पॉक्स लसीचे 60 हजार डोस खरेदी करणार आहे. दिल्लीतील पशुपालकांना या लसी मोफत दिल्या जाणार आहेत. दिल्ली सरकार लसीकरण धोरण वापरेल ज्या अंतर्गत पाच किलोमीटरच्या परिघात निरोगी गुरांना गाय पॉक्सची लस दिली जाईल.

- Advertisement -

लम्पी रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने राज्यांना गुरांची लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्यास सांगितले आहे. सहा-सात राज्यांमध्ये त्याचा अधिक प्रभाव आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार हा आजार गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात पसरला आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातही लम्पीचा शिरकाव झाल्यामुळे कोरोनापाठोपाठ जनावरांचे लॉकडाऊन झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

लम्पीमुळे 57 हजारांहून अधिक गुरांचा मृत्यू

लम्पी आजारामुळे देशभरात 57 हजारांहून अधिक गुरांचा मृत्यू झाला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, राजस्थान आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात गुरांच्या मृत्यूमागे त्यांचे खराब आरोग्य हे एक कारण असू शकते. मध्य प्रदेशातील 10 जिल्ह्यांमध्ये 2,100 हून अधिक गुरांना या आजाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे. मध्य प्रदेश सरकारने राज्याच्या बाधित भागात गोवंश जनावरांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे.

- Advertisement -

लम्पीपासून जनावरांचे असे करा संरक्षण

  • रोग टाळण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे संक्रमित प्राण्याला वेगळे करणे
  • गोठ्याची स्वच्छता ठेवा, डास दूर करण्यासाठी फवारणी आणि संसर्ग टाळण्यासाठी धूर करावा
  • जनावरांना गाऊट पॉक्स विरूद्ध लसीकरण करावे
  • आजारी जनावरांना डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे द्यावीत
  • या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी गोटपॉक्सची लस देणे 
  • गोटपॉक्स लस या रोगाशी लढण्यासाठी प्रभावी सिद्ध झाली आहे

लम्पी रोगाची लक्षणे

हिमाचल प्रदेश सरकारने लम्पी रोगाला महामारी म्हणून घोषित करण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. या आजाराच्या लक्षणांमध्ये जास्त ताप, दूधाचे उत्पादन कमी होणे, त्वचेवर गुठळ्या येणे, भूक न लागणे, नाकातून पाणी येणे आणि डोळ्यांत अश्रू येणे याचा समावेश होतो.

राजस्थानच्या लम्पीचे सर्वाधिक बळी

केंद्र सरकारने केंद्रिय स्तरावर एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे, ज्यातून राज्यांना सर्व शक्य तो सल्ला व मदत दिली जात आहे. राजस्थानला या आजाराचा सर्वाधिक फटका बसल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसून येते. राजस्थानात या आजारामुळे सर्वाधिक 37 हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारकडून या आजाराबाबत राज्यांना सातत्याने सूचना पाठवण्यात येत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -