Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Load Shedding : महाराष्ट्राची होणार बत्तीगूल; विजेची मागणी वाढल्याने रोज अर्धातास भारनियमन!

Load Shedding : महाराष्ट्राची होणार बत्तीगूल; विजेची मागणी वाढल्याने रोज अर्धातास भारनियमन!

Subscribe

यंदा राज्यात बिपरजॉय वादळामुळे मान्सून उशिराने दाखल झाला होता. अशातच पेरण्या आटोपल्यानंतर पिकं ऐन जोमात असताना पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली. अगदी मागील एक ते दीड महिन्यांपासून पावसाचा खंड पडला आहे.

मुंबई : सध्या पावसाने उघडीप दिल्याने महाराष्ट्रात विजेची मागणी वाढली आहे. याचा फटका आता पुरवठ्यावर होणार असून, महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारनियमन लागू केले जाणार असल्याची शक्यता असून, याबाबत अद्याप तरी अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.(Load Shedding: Maharashtra will be Battigul; Daily half hour load regulation due to increase in electricity demand)

यंदा राज्यात बिपरजॉय वादळामुळे मान्सून उशिराने दाखल झाला होता. अशातच पेरण्या आटोपल्यानंतर पिकं ऐन जोमात असताना पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली. अगदी मागील एक ते दीड महिन्यांपासून पावसाचा खंड पडला आहे. याचा परिणाम आता थेट विजेच्या वापरावर होत असल्याने पिके जगवण्यासाठी शेतकरी आहे त्या पाण्यावर सिंचन करत असून, पाण्याच्या उपस्यासाठी लागणाऱ्या विजेचा अतिरीक्त वापर वाढल्याने मागणी वाढली आहे. तेव्हा मागणी वाढल्याने विजेच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने ही मागणीतील तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकार राज्यात भारनियमन लावण्याच्या तयारी असल्याचे बोलले जात आहे. याचा परिणाम आता जनतेवर होणार आहे एवढे मात्र नक्की.

वीजपुरवठा होतोय वारंवार विस्कळीत

- Advertisement -

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही पिकांना विहिरीतील पाण्यावर जगवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत होत नाही. याबरोबरच महावितरणकडून आवश्यक साहित्याचा पुरवठा केला जात नाही. एकीकडे कमी पडलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे तर दुसरीकडे महावितरणकडून त्यांना वीज पुरवठा नीट होत नसल्याने काळजी वाढली आहे.

हेही वाचा :तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे मायबोलीवर प्रेम अन् उद्धव ठाकरे बोलले हिंदीत

भारनियमनाचा वेळ असणार मागणीवर अवलंबून

- Advertisement -

विजेची मागणी जशी वाढेल त्यानुसार हा लोडशेडिंग करण्यात येणार आहे. कधी अर्धा तास, कधी एक तास तर कधी दीड तासांपर्यंत लोडशेडिंग करण्यात येणार आहे. वाढीव मागणी कमी झाली किंवा पाऊस पडल्यास आल्यास लोडशेडिंग आपोआप बंद होईल असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा : मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज : धुळे-सोलापूर महामार्गावर जाळपोळ; नेत्यांनी नोंदवला निषेध

 

एकूण विजेच्या 15 टक्के निर्मिती महाराष्ट्रात

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वात आघाडीचे राज्य आहे. देशात निर्माण होणाऱ्या एकूण विजेच्या 15 टक्के निर्मिती महाराष्ट्रात होते.परंतु तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने गेली काही वर्षे महाराष्ट्रातील जनतेला वीजटंचाईचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात वीजनिर्मिती ही वेगवेगळ्या मार्गाने केली जाते त्यात प्रामुख्याने ऊर्जानिर्मितीसाठी दगडी कोळसा खनिज तेल व नैसर्गिक वायू जलविद्युत याचा वापर केला जातो वीजनिर्मिती करता वापरली जातात हे टर्बाइन्स फिरवण्यास ज्या ऊर्जेचा वापर केला जातो त्यानुसार औष्णिक विद्युत जलविद्युत अनुविद्युत नैसर्गिक वायू विद्युत असे प्रकार पडतात.

- Advertisment -