घरमहाराष्ट्रडमी अकाऊंटद्वारे पीएमसी बँकेने मोठी कर्ज लपवली -जॉय थॉमस

डमी अकाऊंटद्वारे पीएमसी बँकेने मोठी कर्ज लपवली -जॉय थॉमस

Subscribe

पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेने (पीएमसी बँक) एचडीआयएल कंपनीला दिलेली मोठी कर्जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियापासून (आरबीआय) लपवण्यासाठी डमी अकाऊंट आणि इतर पद्धतीचा अवलंब केला असा आरोप, पीएमसी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी एका पत्राद्वारे केला आहे.

प्रत्येक वर्षी आरबीआयच्या तपासणीदरम्यान लपवलेली ही कर्जे उघडकीस येतील याची भीती असायची. त्यामुळे आम्ही खूप तणावात असायचो. ही माहिती आरबीआयपासून लपवण्याची आमची धडपड असायची, असे थॉमस यांनी २१ सप्टेंबर रोजी आरबीआयच्या सुपरवायझर अधिकार्‍यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. बँकेचे ऑडिटर आणि पीएमसी बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळापासून आपणही माहिती लपवली, असे थॉमस यांनी मान्य केले आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात आरबीआयने पीएमसी बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले. त्यामुळे बँकेच्या खातेधारकांना बँकेच्या विविध खात्यांतून रक्कम काढता आली नाही. सुरुवातीला सहा महिन्यांत फक्त सहा हजार रुपये खात्यातून काढण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर ही मर्यादा १० हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. आरबीआयने पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय मंडळ बरखास्त केले. त्यात थॉमस यांचाही समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -