Homeमहाराष्ट्रLocal Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिलमध्ये विसरा, ऑक्टोबरमध्ये होण्याची...

Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिलमध्ये विसरा, ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता

Subscribe

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सर्वांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले होते. मात्र आज सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीतही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात निर्णय झालेला नाही. यासंदर्भात पुढील सुनावणी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे.

Supreme Court on Local Body Election : नवी दिल्ली : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात निर्णय होण्याची शक्यता होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सर्वांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले होते. मात्र आजच्या सुनावणीतही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात निर्णय झालेला नाही. यासंदर्भात पुढील सुनावणी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. (Local body elections in Maharashtra to be held after February)

राज्यातील 29 महानगरपालिका, 32 जिल्हा परिषदा, 289 पंचायत समित्या, 244 नगरपालिका तसेच 41 नगरपंचायती निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे यावर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात निकाल लागण्यासाठी राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे. यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी ओबीसी आरक्षणासंदर्भात दाखल सर्व याचिकांवरही चर्चा करण्यात आली.

न्या. सूर्यकांत आणि न्या. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणीत आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. यासंदर्भात पुढील सुनावणी 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे. सरकारी वकील सिद्धार्थ शिंदे यांनी 25 फेब्रुवारी रोजी निर्णय आल्यावर एप्रिल किंवा मेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली आहे.

हेही वाचा – Ajit Pawar : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला; अजित पवार, पंकजा मुंडे गुरुवारी बीड दौऱ्यावर

सुनावणी संपल्यानंतर सरकारी वकील सिद्धार्थ शिंदे यांनी माहिती दिली की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर 25 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. जर 25 फेब्रुवारी रोजी निर्णय आला तर एप्रिल किंवा मेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. तसेच न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुनावणी 25 फेब्रुवारी रोजी सुरुवातीला ठेवली आहे, अशी माहिती सिद्धार्थ शिंदे यांनी दिली.

निवडणुका ऑक्टोबरपर्यंत लांबण्याची शक्यता?

सिद्धार्थ शिंदे यांनी शक्यता वर्तवली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात 25 फेब्रुवारी रोजी निकाल आला तरी या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. कारण एप्रिल आणि मे महिन्यात शाळेला आणि महाविद्यालयांना सुट्टी असते. त्यामुळे याकाळात बहुतेक नागरिक गावाला जातात. यानंतर जून महिन्यात शाळेला सुरुवात होते. तसेच पावसाळाही सुरू होत असल्याने या काळात निवडणुका होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

हेही वाचा – Devendra Fadnavis : पुण्यात भारतइंग्लंड सामना, GBS आजाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सूचना