लॉकडाऊन काळात लालपरीची १२५ कोटींची कमाई, मजूर- श्रमिकांचा एसटीला आधार

ST Bus
करोनामुळे गेली दोन  महिन्यापासून देशातील सर्व उद्योग धंदे , व्यापार, दळणवळण सगळे ठप्प झाले. याला महाराष्ट्राची एसटी देखील अपवाद नव्हती, मुंबई, ठाणे व पालघर या उपनगरातील अत्यावश्यक सेवेचा अपवाद वगळता राज्याच्या एसटीचे ” चाक गेली दोन महिने थांबले होते. त्यामुळे एसटीला दीड हजार कोटीपेक्षा जास्त तोटा एसटीला महाममंडळा झाला आहे. मात्र गेल्या एक महिन्यात एसटी महामंडळाने अडकलेल्या श्रमिक -मजुरांचा आणि इतर वाहतुकीच्या माध्यमातून १२५ कोटी पेक्षा पेक्षा जास्त महसूल गोळा केला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीला श्रमिक – मजुरांच्या वाहतुकीमुळे मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
कोट्यवधी रुपयांच्या तोट्यात असलेल्या ग्रामीण भागातील एसटी कोरोनाचा विळख्यात अडकली आहे. कोरोनामुळे दररोज एसटी महामंडळाला २२ कोटी रुपयाचे महसुलाचे नुकसान होत आहे. आतापर्यत एसटीला तब्बल १५०० कोटी  पेक्षा जास्त रुपयाचे नुकसान सोसावे लागले आहे. लॉकडाऊनमुळे २३ मार्चपासून एसटीची राज्यभरात एसटी चाक थांबले आहे. फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबई, ठाणे आणि पालघर या विभागातील एसटी बसेसच्या विशेष फेऱ्या धावत आहे. त्यानंतर पायपीठ करत जाणाऱ्या मजुरांना त्यांच्या सीमेपर्यत एसटीने सोडण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते. त्यामुळे  ९ में २०२० पासून एसटी महामंडळाने  ४१ हजार ८७४ बस फेऱ्यांच्या माध्यमातून ५ लाख ८ हजार ८०३ स्थलांतरीतांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत किंवा नजीकच्या रेल्वे स्टेशन्सपर्यंत नेऊन सोडण्यात आले आहे.याकरिता महाराष्ट्र शासनाकडून  १०० टक्के निधी एसटी महामंडळाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.आतापर्यत ९४.६६ कोटी रुपये खर्च मजुरांच्या वाहतुकीला लागला आहे. तसेच मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटीच्या विशेष फेऱ्या चालविण्यात येत आहे. या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रवासी भाडे महाराष्ट्र शासन देणार आहे. तसेच गेल्या दोन महिन्यात राज्यस्थानच्या कोट्यातून अडलेल्या मराठी मुलांना आणण्यासाठी एसटीचा बहात्तर बसेस सडल्या होत्या. तर ऊसतोड कामगारांसाठी सूडज शेकडो बसेस एसटीने चालविलेल्या आहे. त्यामुळे जवळ जवळ एसटीने लॉकडाऊन काळात १२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याच्या सर्वाधिक कमाई श्रमिक- मजुरांच्या वाहतुकीतून मिळणार आहे.

मालवाहतुकीतून मिळणार महसून 

तब्बल दोन  महिन्या नंतर ही  एसटीची सेवा हळूहळू राज्यात सुरु होत आहे. मात्र एसटी महसूल मिळावा याकरिता एसटी महामंडळ मालवाहतूक क्षेत्रात उतरली आहे. आता कोंकणातील हापुस आंबा मालाची वाहतूक सुरु केली आहे..सध्या एसटीकडे 300 ट्रक तयार आहेत. त्याचबरोबर काही जुन्या बसेसचे रूपांतर मालवाहू ट्रक मध्ये करण्यात येत आहे. सध्या मध्यवर्ती कार्यालय प्रमाणे जिल्हास्तरावर मालवाहतुकीसाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे महसूल वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मालवाहतुकीतून हातभार लागणार आहे.