घरमहाराष्ट्रMaharashtra lockdown : निर्बंध १५ जूनपर्यंत कायम, मात्र दुकाने २ वाजेपर्यंत राहणार...

Maharashtra lockdown : निर्बंध १५ जूनपर्यंत कायम, मात्र दुकाने २ वाजेपर्यंत राहणार सुरु

Subscribe

या संबंधित निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक पातळीवर होणार

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तर रुग्णसंख्या हव्या त्या प्रमाणात कमी न झाल्याने कडक निर्बंध १५ जून वाढवण्याचा निर्णय राज्य सरकराने घेतला आहे. असे असले तरी रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध शिथील करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे कमी रुग्णसंख्या असलेल्या शहरांत आणि जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत खुली राहू शकतील.

ज्या शहरे आणि जिल्ह्यांतील कोरोना पॉझिटिव्ह रेट १० टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि ऑक्सिजनयुक्त बेड्स ४० टकक्यांपेक्षा कमी भरलेले असतील अशा शहारांमध्ये दुकाने सकाळी ७ ते २ पर्यंत खुली ठेवण्याची मुभा असेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

- Advertisement -

राज्यात यापूर्वी अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची याआधी परवानगी होती. सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुकाने, मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील. तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -