घरताज्या घडामोडीऔरंगाबादमध्ये नव्या ४५ रुग्णांची वाढ; तर ७३७ रुग्णांवर उपचार सुरु

औरंगाबादमध्ये नव्या ४५ रुग्णांची वाढ; तर ७३७ रुग्णांवर उपचार सुरु

Subscribe

औरंगाबादमध्ये ४५ नव्या रुग्णांची वाढ झाली असून सध्या ७३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

कोरोनाचा विळखा औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस अधिकच घट्ट होताना दिसत आहे. औरंगाबादमध्ये ४५ नव्या रुग्णांची वाढ झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ६५ झाली आहे. तर यापैकी १ हजार २२४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १०४ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने आता ७३७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

औरंगाबादमध्ये आढळलेले रुग्ण

औरंगाबादमध्ये आढळलेले रुग्ण हे शिवशंकर कॉलनी (१), बौद्ध नगर (१), पीर बाजार, उस्मानपुरा (८), पोलीस क्वार्टर, तिसगाव (१), भोईवाडा, मिलकॉर्नर (१), सातारा परिसर (३), पद्मपुरा (१), फाजीलपुरा, मोहनलाल नगर (१), सिडको एन-नऊ, रेणुका माता मंदिर (१), न्यू हनुमान नगर, गारखेडा (१), मजनू हिल, दमडी मोहल्ला (१), ज्युबली पार्क (१), गारखेडा परिसर (१), चिकलठाणा (२), बौद्ध नगर, जवाहर कॉलनी (१), एन-नऊ, संत ज्ञानेश्वर नगर (५), सादाफ कॉलनी, कटकट गेट (२), पुंडलिक नगर (१), विद्या निकेतन कॉलनी (२), भोईवाडा (१), शिवाजी नगर, गारखेडा (१), सेंट्रल नाका, बायजीपुरा (१), एन-चार, सिडको (१), कैलास नगर (१), गणेश नगर, पंढरपूर परिसर (१), अन्य (२), देवशी पिंपळगाव, गंगापूर (१), सावरखेडा, सोयगाव (१) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये १८ महिला आणि २७ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisement -

राज्यात ३००७ नवे रुग्ण

राज्यातील करोना रुग्णांची संख्या कमी होत असताना रविवारी अचानक तब्बल ३००७ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ८५ हजार ९७५ वर पोहोचली आली आहे. त्याचप्रमाणे ९१ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३०६० झाली आहे. राज्यातील मृत्यू दर ३.५५ टक्क्यांवर आला आहे. रविवारी राज्यातील १९२४ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून आजपर्यंत ३९ हजार ३१४ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४५.७२ टक्के एवढे आहे.


हेही वाचा – पुणे : २४ तासांत आढळले १५९ नवे रुग्ण; तर ५ हजार रुग्ण कोरोनामुक्त

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -