घरमहाराष्ट्रउत्तर प्रदेशात लॉकडाऊन हटवण्यास झाली सुरुवात

उत्तर प्रदेशात लॉकडाऊन हटवण्यास झाली सुरुवात

Subscribe

१ जूनपासून ६०० पैकी कमी अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या असणार्‍या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय

उत्तर प्रदेश सरकारने लॉकडाऊन हटवण्यास सुरुवात केली असून १ जूनपासून ६०० पैकी कमी अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या असणार्‍या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

लखनऊ, नोएडा, गाजियाबादसारखी मोठी शहरे असणारे जिल्हे जिथे अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या जास्त आहे तिथे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे. उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ६०० पेक्षा कमी अ‍ॅक्टिव्ह रुग्ण कमी असणार्‍या जिल्ह्यांमध्ये सोमवारी ते शुक्रवार बाजारपेठा सकाळी ७ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहतील. वीकेण्ड कर्फ्यू मात्र कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वीकेण्डला शहर आणि ग्रामीण भागातील बाजारपेठा सॅनिटाइज करण्यात येतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -