घरमहाराष्ट्रक्वारंटाइनचा शिक्का पुसून लेकासह आईने केला रेल्वे प्रवास!

क्वारंटाइनचा शिक्का पुसून लेकासह आईने केला रेल्वे प्रवास!

Subscribe

होम क्वारंटाइनचा शिक्का हातावर मारला असताना देखील दोघांनी केला रेल्वे प्रवास

राज्यभरासह देशभरात करोनाने थैमान घातलेलं असताना प्रशासनाकडून या युद्धाला सामोरे जाण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. अशातच करोनाबाधित रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनाचा धोका टळण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉक डाऊन असणार अशी नुकतीच घोषणा करत देशातील सर्वांनाच घरी राहण्याचे आवाहन देखील केले. मात्र काही ठिकाणी नियमांचे पालन होताना दिसत नाही. काहीसा असाच प्रकार समोर आला आहे.

होम क्वारंटाइन राहण्याची सूचना केली असताना देखील मायलेकाने त्यांच्या हातावरील होम क्वारंटाइनचा शिक्का पुसून काही दिवसांपुर्वी प्रवास केला होता. मात्र हे दोघं करोना व्हायरसचे पॉझिटिव्ह आढळले आहे.

- Advertisement -

असा घडला प्रकार

मुंबई विमानतळावर आरोग्य विभागाकडून मारण्यात आलेला या मायलेकाच्या हातावरील होम क्वारंटाइनचा शिक्का त्या दोघांनी पुसून मुंबई-लखनऊ असा रेल्वेचा प्रवास केला. या प्रवासादरम्यान मायलेकांना करोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. या घडलेल्या प्रकारामुळे स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले आहे. हा सर्व प्रकार उत्तर प्रदेशातील पिलभीत या भागात घडला.

हे दोघं मायलेक परदेशातून प्रवास करून आल्यानंतर त्यांची मुंबई विमानतळावर तपासणी करण्यात आली होती. या तपासणीदरम्यान त्या दोघांना होम क्वारंटाइन असण्याची सूचना दिली होती. मात्र तरी देखील त्यांनी रेल्वेने मुंबई-लखनऊ असा प्रवास केला होता. लखनऊला पोहोचल्यावर वैद्यकीय तपासणी केली असता या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच या महिलेसोबत आलेले इतर प्रवासीही संशयित असून त्यांनाही होम क्वारंटाइन राहण्याची सूचना देण्यात आली आहे.


CoronaVirus- ‘घराबाहेर जाऊ नकोस’ असं सांगितलं म्हणून केली भावाची हत्या!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -