घरCORONA UPDATECorona: पुणे जिल्ह्यात १३ जुलैपासून लॉकडाऊन; पालकमंत्री अजित पवारांचे आदेश

Corona: पुणे जिल्ह्यात १३ जुलैपासून लॉकडाऊन; पालकमंत्री अजित पवारांचे आदेश

Subscribe

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे सोमवार, १३ जुलैपासून पुढील १५ दिवसांसाठी पुणे महानगरपालिका तसेच पिंपरी- चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन असणार आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात पुढील १५ दिवस पुन्हा लॉकडाऊन करण्यात येईल.

हेही वाचा – धक्कादायक! हॉस्पिटलमधून पळालेल्या कोरोना रुग्णाचा फुटपाथवरच मृत्यू

- Advertisement -

पुण्यात पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आढावा बैठकीत मर्यादित वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील, सोशल डिस्टन्स पाळण्यावर कटाक्ष देण्यात आला होता. लॉकडाऊनसंबंधी लवकरच नियमावली जारी करण्यात येणार आहे. दरम्यान, नागरिकांना काही वस्तूंची खरेदी करण्यासाठी, अत्यावश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी वेळ देणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी उपमुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यानंतर अजित पवार यांनी लॉकडाऊन कधी लागू करायचा याचा निर्णय दोन्ही महापालिकांच्या आयुक्तांवर सोपवला आहे. त्यामुळे लॉकडाऊन सोमवारी लागू करायचा की मंगळवारी या निर्णय मनपा आयुक्त घेणार आहेत.

पुणे शहरातील कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येने १५ हजारांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत १५ हजार ५७९ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ८ हजार ८०९ रुग्णांपैकी ४०२ रुग्ण गंभीर असून यातील ७५ रुग्ण व्हेंटिलेटरवर तर ३२७ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -