घरCORONA UPDATEVideo :लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्याचा आता विचार नाही - मुख्यमंत्री

Video :लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्याचा आता विचार नाही – मुख्यमंत्री

Subscribe

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरू करण्यात आलं आहे. पण मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक व्यवहारांनी परवानदी देण्यात आली आहे. पण तरीही लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्याचा आता विचार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली यावेळी ते बोलत होते.

या मुलाखतीच्या पहिल्या भागात मुख्यमंत्र्यांनी राज्याचा कोरोनाशी लढा कसा सुरू होणार याविषयी सविस्तर माहिती दिलीये. माणसांचे जीव वाचवायचे असतील तर लॉकडाऊन एकदम उठवता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. मुंबईत सर्व सामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा विचार नसल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. लॉकडाऊन उठवल्यानंतर अनेक देशांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याची उदाहरणे असल्याने तसा निर्णय घेणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. जे लोक लॉकडाऊन उठवण्याची मागणी करत आहेत ते लोकांचे जीव गेल्यास त्याची जबाबदारी घेणार आहेत का? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.

- Advertisement -

अंतिम वर्षाच्या परीक्षा नाहीच…

कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. युजीसीने जरी परीक्षा सक्तीच्या असल्याचे म्हटले असले तरी विद्यार्थ्यांच्या जीवाच्या दृष्टीने परीक्षा घेणे योग्य होणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.


हे ही वाचा – Video : विरोधकांनो पोटदुखी थांबवा, मुख्यमंत्र्यांची ‘अनलॉक मुलाखत’!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -