घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रज्ञानदीप गुरूकुल आधाराश्रमास टाळे

ज्ञानदीप गुरूकुल आधाराश्रमास टाळे

Subscribe

नाशिक : राज्यभर बहुचर्चित असलेल्या द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमातील अध्यक्षानेच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या गुन्ह्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलिसांनी गुरुकुल आधाराश्रमास टाळे ठोकले आहे. येथील मुलींची शासकीय बालसुधारगृहात निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

म्हसरूळ परिसरातील गुरुकुल आधारश्रमात अध्यक्ष हर्षल मोरे ऊर्फ सोनू सर याने सात मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या गुन्ह्याची व्याप्ती वाढत असल्याने पोलिसांनी सखोल तपासाला सुरुवात केली आहे. आश्रमातील काही अल्पवयीन मुलींना त्यांच्या कुटुंबियांकडे परत पाठवण्यात आले आहे. मात्र, पीडित सहा मुलींना शासकीय बालसुधारगृहात स्थलांतर करण्यात आले असून, त्यांची चौकशी केली जात आहे. लैंगिक शोषणप्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. त्याचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला पाठवला जाणार आहे.

- Advertisement -

ज्ञानदीप आधारश्रम 2018 मध्ये सुरू केल्यापासून संशयित आरोपी हर्षल मोरे अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करत होता. त्याने काही मुलींवर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केला असून, त्यापैकी एका मुलीवर सटाण्यात अत्याचार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. गुह्याची व्याप्ती वाढत असल्याने पोलिसांनी आरोपीविरुद्ध पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. शिवाय, आधारााश्रम सुरू असलेल्या इमारतीच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले आहे. विशेष म्हणजे, मानेनगरमधील नागरिकदेखील ज्ञानदीप नावाच्या या तथिकथित आधाराश्रमाबाबत अनभिज्ञ होते. पोलिसांनी आश्रमाशेजारील नागरिकांची चौकशी केली असता त्यांनी असा आधाराश्रम सुरू असल्याचे कधी समजले नाही, असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -