घरमहाराष्ट्रवाचा! राज्यात कधी, कुठे होणार मतदान?

वाचा! राज्यात कधी, कुठे होणार मतदान?

Subscribe

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी पुढील, एप्रिल महिन्यात मतदान होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात चार टप्प्यात हे मतदान पार पडणार आहे.

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी पुढील, एप्रिल महिन्यात मतदान होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात चार टप्प्यात हे मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात ७ जागांसाठी ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून दुसऱ्या टप्प्यातील १० जागांसाठी १८ एप्रिलला मतदान होणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील १४ जागांसाठीचे मतदान २३ एप्रिलला होणार असून चौथ्या आणि अंतिम टप्प्यातील १७ जागांसाठीची मतदान प्रक्रिया २९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. राज्यातील कोणत्या मतदारसंघात कोणत्या टप्प्यात मतदान होईल, याचीही यादी राज्य निवडणूक आयोगाने जारी केली असून यामध्ये विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई शहर असे विभाजन झाल्याचे दिसत आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदान

  • वर्धा
  • रामटेक
  • नागपूर
  • भंडार – गोंदिया
  • गडचिरोली
  • चंद्रपूर
  • यवतमाळ- वाशिम

दुसऱ्या टप्प्यातील मतदान

  • बुलडाणा
  • अकोला
  • अमरावती
  • हिंगोली
  • नांदेड
  • परभणी
  • बीड
  • उस्मानाबाद
  • लातूर
  • सोलापूर

तिसऱ्या टप्प्यातील मतदान

  • जळगाव
  • रावेर
  • जालना
  • औरंगाबाद
  • रायगड
  • पुणे
  • बारामती
  • अहमदनगर
  • माढा
  • सांगली
  • सातारा
  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग
  • कोल्हापूर
  • हातकणंगले

चौथ्या टप्प्यातील मतदान

  • नंदुरबार
  • धुळे
  • दिंडोरी
  • नाशिक
  • पालघर
  • भिवंडी
  • कल्याण
  • ठाणे
  • मावळ
  • शिरुर
  • शिर्डी
  • मुंबई उत्तर
  • मुंबई उत्तर पश्चिम
  • उत्तर पूर्व
  • उत्तर मध्य
  • दक्षिण मध्य
  • दक्षिण मुंबई

महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान

पहिला टप्पा – ११ एप्रिलला महाराष्ट्रात ७ जागांसाठी मतदान

- Advertisement -

दुसरा टप्पा –१८ एप्रिलला महाराष्ट्रात १० जागांसाठी मतदान

तिसरा टप्पा – २३ एप्रिलला महाराष्ट्रात १४ जागांसाठी मतदान

- Advertisement -

चौथा टप्पा – २९ एप्रिलला महाराष्ट्रात १७ जागांसाठी मतदान


या तारखा महत्त्वाच्या

अर्ज भरण्याची तारीख – १८ मार्चपासून

अर्ज भरण्याची शेवटची तारीख – २५ मार्च

अर्ज छाननी – २६ मार्च

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – २८ मार्च

मतदानाची तारीख – ११ एप्रिल

निकाल – २३ मे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -