घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदारसंघांसाठी 97 उमेदवार रिंगणात

Lok Sabha 2024 : नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदारसंघांसाठी 97 उमेदवार रिंगणात

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून पहिल्या टप्प्यातील निवडणुकप्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडणूक प्रक्रियेनुसार आज उमेदवार अर्ज मागे घेण्याची तारीख होती. या पाच मतदासंघातून एकूण 13 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून 97 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत.

नागपूर : लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून पहिल्या टप्प्यातील निवडणुकप्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडणूक प्रक्रियेनुसार आज उमेदवार अर्ज मागे घेण्याची तारीख होती. या पाच मतदासंघातून एकूण 13 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून 97 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात कोणत्या उमेदवारा सर्वाधिक मत मिळतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Lok Sabha 2024 97 candidates in five Lok Sabha constituencies in Nagpur division)

महाराष्ट्रात लोकसभेच्या पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली-चिमूर या मतदारसंघाचा समावेश आहे. या पाच मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदारप्रक्रिया पार पडणार आहे. तसेच, 4 जून मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांसाठी एकूण 97 उमेदवार रिंगणात आहेत.

- Advertisement -

रामटेक, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून एकूण 13 उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. पण नागपूर, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून एका उमेदवारे आपला अर्ज मागे घेतला नाही.

लोकसभा निवडणूक 2024 साठी नागपूर लोकसभा मतदारसंघातून 26 जणांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यापैकी एकाही उमेदवाराने आज अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे 26 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहेत.

- Advertisement -

रामटेक लोकसभा मतदारसंघात एकूण 35 जणांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यापैकी 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता रामटेक लोकसभेच्या रिंगणात 28 उमेदवार आहेत.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात एकूण 22 जणांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यापैकी चार उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता भंडारा-गोंदिया लोकसभेच्या रिंगणात 18 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात एकूण 12 जणांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्या उमेदवारांपैकी नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी मिलींद नरोटे व हरिदास बारेकर या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे आता 10 उमेदवारांमध्ये निवडणुकीची लढत होणार आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 15 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे चंद्रपूर लोकसभेच्या रिंगणात 15 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.


हेही वाचा – LOK SABHA 2024 : नाशिकचा वाद सोडवण्यासाठी शिंदेंचा अजित पवारांना शिरूरचा प्रस्ताव; वाचा सविस्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -