घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरLok Sabha 2024 : राष्ट्रवादीची नाराजी आली समोर; अजित पवारांनी विटेकरांना भर...

Lok Sabha 2024 : राष्ट्रवादीची नाराजी आली समोर; अजित पवारांनी विटेकरांना भर सभेत दिले आमदारकीचे आश्वासन

Subscribe

परभणी – अजित पवारांनी राजेश विटेकर यांना भर सभेत आमदार करण्याचे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले की, राजेश विटेकरला मी सहा महिन्यांपूर्वी परभणी लोकसभेची तयारी करण्यास सांगितले होते. तो देखील सहा महिन्यांपासून कामाला लागला, आता महादेव जानकरांसाठी त्याला माघार घेण्यास सांगितले. मात्र मी परभणीकरांना शब्द देतो की येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये राजेश विटेकरला विधिमंडळाचा सदस्य केल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन अजित पवारांनी राजेश विटेकर आणि परभणीतील पक्षाच्या नेते-कार्यकर्त्यांना दिला आहे.

महायुती जागा वाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्या खात्यात गेला आहे. भारतीय जनता पक्षाने येथून महादेव जानकरांना उमेदवारी दिली आहे. आज जानकरांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आयोजित विजयी संकल्प मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री आणि बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, अजित पवार गटाचे राजेश विटेकर उपस्थित होते.

- Advertisement -

महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांसह इतरही छोटे पक्ष आहेत. त्यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. त्याबद्दल अजित पवार म्हणाले की, परभणीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसची होती. मात्र बहुजनांनाही प्रतिनिधीत्व देण्याची गरज आहे. त्यामुळे समाजातील विविध घटकाला प्रतिनिधित्व द्यावे लागत आहे. शेवटी हे बहुजनांचे राज्य आहे. या जागेसाठी अनेकजण इच्छूक होते. परंतू एकदा महायुतीच्या श्रेष्ठींनी घेतलेला निर्णय सर्वांनी मान्य करायचा असतो, असे अजित पवार म्हणाले.

परभणीतील राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांना माघार घ्यायला लावली असल्याचे सांगत त्यांना विधिमंडळात पाठवणारच असा शब्द अजित पवारांनी भर सभेत दिला. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सहभागी झाल्यामुळे अजित पवार गटाला फार कमी जागा आल्या, त्यामुळे त्यांच्या नेते आणि कार्यकर्तांची नाराजीच एक प्रकारे अजित पवारांनी विटेकरांच्या निमित्ताने बोलून दाखवल्याची चर्चा परभणीत होती.

- Advertisement -

हेही वाचा : Parbhani : ठाकरेंचे उमेदवार निवडून आल्यानंतर जनतेला, विकासाला विसरायचे; फडणवीसांची संजय जाधवांवर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -