घरमहाराष्ट्रनाशिकLok Sabha 2024 : नाशिक लोकसभेवर छगन भुजबळांचा दावा, संजय शिरसाट म्हणतात...

Lok Sabha 2024 : नाशिक लोकसभेवर छगन भुजबळांचा दावा, संजय शिरसाट म्हणतात…

Subscribe

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा लढवण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले. त्यांना आता शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : आता कोणाची उमेदवारी दिल्लीहून आली असे म्हणत असतील, तर याबद्दल आम्हाला कल्पना नाही. पण अशाप्रकारे कोणाला दिल्लीहून उमेदवारी मिळाली म्हणून उभे राहायचे सांगितले असेल, तर ते समोर येईलच. पण, ती जागा आम्ही सोडणार नाही हे मात्र निश्चित आहे, असे सांगत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी नाशिक लोकसभेवर शिंदे गटाचा ठाम दावा सांगितला आहे. (Lok Sabha 2024 : Chhagan Bhujbal claim on Nashik Lok Sabha, Sanjay Shirsat says…)

हेही वाचा… Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभा लढण्याबाबत भुजबळांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – वरिष्ठ सांगतील तेच…

- Advertisement -

संजय शिरसाट यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कारण आजच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा लढवण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले. ज्यानंतर शिरसाटांकडून या जागेवर दावा सांगितला आहे. दिल्लीत चर्चा सुरू असताना माझे नाव समोर आले. त्यानंतर त्यांनी भुजबळांनी ही नाशिक लोकसभेतून निवडणूक लढवावी, असा निर्णय घेतला,असे प्रसार माध्यमांना सांगत भुजबळांनी नाशिक लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले. यानंतर काही वेळातच शिंदे गटाकडून संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत म्हटले की, जिथून एक माणूस दोन वेळा मोठ्या मताने जिंकून येतो, ती जागा काढून घेणे म्हणजे शिवसैनिकांचा अस्तित्व संपवण्याचा प्रकार आहे आणि असा प्रकार आम्ही होऊ देणार नाही. त्यामुळे ती जागा आम्ही सोडणार नाही हे मात्र निश्चित आहे.

तसेच, नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवाराने प्रचार सुरू केला आहे. एक निश्चित आहे नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे नाशिकची जागा शिवसेनेनेच लढवली पाहिजे असा आग्रह नाशिकच्या नागरिकांचा आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेला द्यावी किंवा शिवसेनेने सोडू नये यासाठी सर्व कार्यकर्ते आग्रही आहे. आम्ही देखील मुख्यमंत्री यांना याबाबत सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री यांनी देखील यावर आपण सकारात्मक विचार करू असं सांगितले असल्याचे प्रवक्ते संजय शिरसाट यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता नाशिक लोकसभा मतदारसंघामुळे महायुतीत एका दाव्याने नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -