घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : नाशिकचा वाद सोडवण्यासाठी शिंदेंचा अजित पवारांना शिरूरचा प्रस्ताव;...

Lok Sabha 2024 : नाशिकचा वाद सोडवण्यासाठी शिंदेंचा अजित पवारांना शिरूरचा प्रस्ताव; वाचा सविस्तर

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून देशात सात आणि महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्तेत असलेल्या महायुतील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांनी 48 मतदारसंघांपैकी काही मतदारसंघात आपला उमेदवार जाहीर केला आहे. आतापर्यंत भाजपने 24, शिवसेनेने 8 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 4 जागांवर आपला उमेदवार जाहीर केला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून देशात सात आणि महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्तेत असलेल्या महायुतील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांनी 48 मतदारसंघांपैकी काही मतदारसंघात आपला उमेदवार जाहीर केला आहे. आतापर्यंत भाजपने 24, शिवसेनेने 8 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 4 जागांवर आपला उमेदवार जाहीर केला आहे. मात्र, काही जागांवर सातत्याने चर्चा करूनही अद्याप तोडगा निघालेला नाही. यामध्ये नाशिक आणि शिरूर लोकसभा मतदासंघाचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली तरी अद्याप या दोन्ही जागांवरील महायुतीतील वाद थांबलेला नाही. अशातच आता शिवसेनेकडून राष्ट्रवादी अनोखा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, शिरूरची जागा शिवसेनेला सोडावी आणि नाशिकच्या जागेतून राष्ट्रवादीने निवडणूक लढवावी असा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेकडून देण्यात आल्याचे समजते. (Lok Sabha 2024 cm eknath shinde praposal to ajit pawar ncp nashik and shirur lok sabha constituency)

महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जागावाटप केले असले तरी अनेक जागांवरून वाद अद्याप सुरुच आहे. विशेषत: शिरूर आणि नाशिक मतदारसंघांवरून महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद सुरू आहे. कारण 2019च्या लोकसभेत शिवसेनेच्या शिवाजीराव अढळराव पाटील यांनी निवडणूक लढवली होती. पण त्यांचा राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेंनी पराभव केला. मात्र, यंदाच्या निवडणुकीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याने शिवाजीराव अढळराव पाटील यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रसमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादीकडून शिरूर मतदारसंघाची उमेदवारी मिळवली.

- Advertisement -

दुसरीकडे, नाशिकच्या जागेवरूनही महायुतीत वाद सुरू असून शिवसेनेसह भाजप, राष्ट्रवादी आणि मनसेनेही या जागेवर दावा केला आहे. मात्र हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईत तळ ठोकून होते. पण मुख्यमंत्री नाही तर त्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे त्यांना भेटले. त्यावेळी हेमंत गोडसे यांनी नाशिकची जागा आपल्याकडे राहावी असे त्यांना सांगत यंदा उमेदवारीही आपल्यालाच मिळणार असा दावा केला. पण अद्याप नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, हेमंत गोडसे यांना श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर आपल्या मतदारसंघात परतत काळाराम मंदिराचे दर्शन घेतले आणि प्रचाराला सुरूवात केली.

छगन भुजबाळांना नाशिकमधून उमेदवारी?

एककिडे नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी प्रचाराला सुरूवात केली असली तरी, दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही या मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भूजबळ यांचे नाव या मतदारसंघातून चर्चेत असून त्यांना दिल्लीतून तयारी करण्यास सांगितल्याचा गौप्यस्फोट त्यांनी स्वत:च केला. त्यावेळी, “मी तिकिटासाठी आग्रही नव्हतो हे मी मागेही सांगितले होते. दिल्लीत नाशिकच्या जागेवर चर्चा सुरू असताना माझे नाव पुढे आले. याची मला काहीही कल्पनाही नव्हती. होळीसाठी नाशिकला पोहचत असताना मला फोन आला. त्यानंतर मी अर्ध्या वाटेतून पुन्हा मुंबईला गेलो. वरिष्ठ पातळीवरून निर्णय झाल्याचे मला सांगण्यात आले. त्यावर विचार करण्यासाठी मी एका दिवसाचा वेळ मागून घेतला. त्यानंतर मी अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यावर आम्ही चाचपणी केली असून तुम्हाला उभे राहावे लागेल, असे त्यांनी सांगितले, पण तयारी करण्याआधीच ही गोष्ट बाहेर गेली आणि नाशिकमध्ये चर्चा रंगली. मी लढणार असल्याचे बॅनर्स गावागावात लागल्याचे मला कळाले. पण नाशिकमधून शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे लढण्यास इच्छुक आहेत, पण महायुतीचे नेते जो निर्णय देतील तो मला मान्य आहे”, असे छगन भूजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला प्रस्ताव

अशातच, नाशिकवरून सुरू असलेला हा वाद थांबवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अजित पवारांना प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या प्रस्तावानुसार, नाशिकची जागा छगन भुजबळांच्या उमेदवारीने राष्ट्रवादीने लढवावी, पण शिरूरची जागा शिवसेनेसाठी सोडावी. मात्र, हा प्रस्तावर जरी शिदेंनी पवारांना दिला असला तरी, शिरूर मतदारसंघातून शिवाजीराव अढळराव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ही उमेदवारी मागे घेत पुन्हा ही जागा राष्ट्रवादी शिवसेनेसाठी सोडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कल्याण किंवा ठाणे? एकनाथ शिंदेंसमोर नवा पेच

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय कोंडी झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच ठाणे की कल्याण, असा नवा पेच एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदे यांची जागा वाचवण्यासाठी ठाणे मतदारसंघावर दावा करायचा की कल्याणच्या जागेवर, याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी लांबणीवर टाकल्याची चर्चा आहे.


हेही वाचा – Lok Sabha 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामतीत सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -