घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपाकडेच; नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात

Lok Sabha 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपाकडेच; नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात

Subscribe

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दावा केला असला तरी, आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपाकडेच राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे सांगण्यात येते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या मतदारसंघात विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पुन्हा तिकीट दिले आहे.

हेही वाचा – Thackeray group : स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, ठाकरे गटाच्या रडारवर मोदी सरकार

- Advertisement -

महाराष्ट्रातील इतर काही जागांप्रमाणेच कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून भाजपा आणि शिवसेनेते रस्सीखेच सुरू होती. रत्नागिरी-सिंधुदुर्ग यासह शिवसेनेने लढविलेल्या सर्व जागा मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मांडली होती. त्यातच उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण रवींद्र सामंत हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याची चर्चा होती. “मी… मी किरण रवींद्र सामंत… रोकेगा कौन?” असे स्टेटस त्यांनी सोशल मीडियाच्या प्रोफाइलवर ठेवल्याने या चर्चेला खतपाणी मिळाले.

त्यापाठोपाठ शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी देखील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत आग्रही भूमिका घेतली होती. या मतदारसंघातील विद्यमान खासदार हा शिवसेनेचा आहे. तुम्हाला सगळ्या पक्षाला संपवून भाजपाला एकट्याला जिवंत राहायचे आहे का? असा निष्कर्ष निघेल, असे सांगत, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही रत्नागिरीची देखील जागा सोडणार नाही, आम्ही ती लढवणारच, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Jitendra Awhad : राजकारणात एवढे प्रेम, आपुलकी एकमेकांबद्दल होती…; आव्हाडांनी शेअर केले बाळासाहेबांचे पत्र

मात्र, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत शिंदे गटाचा दावा फेटाळला. विविध पक्षांचे बरेच नेते रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्‍या जागेसंबंधी आपला हक्‍क दाखवित आहेत. पण रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भाजपाची असून भाजपाच ती लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.

या पार्श्वभूमीवर राज्यसभेतून निवृत्त झाल्यानंतर नारायण राणे यांना पुन्हा संधी देण्यात आली नाही. त्याचवेळी त्यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून तिकीट देणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येते. त्याच अनुषंगाने नारायण राणे उद्या, बुधवारी या मतदारसंघाच्या दौऱ्यावर जाणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) रवींद्र चव्हाण हे त्यांच्या सोबत असतील. त्यामुळे शिंदे यांच्या हातातून ही जागा निसटल्यात जमा असून त्याचे पडसाद या मतदारसंघात कसे उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Loksabha Election 2024 : भाजपाने ईव्हीएम हटवण्याची हिंमत दाखवावी; संजय राऊतांचे आव्हान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -