घरमहाराष्ट्रLok Sabha 2024: शरद पवारांचे आभार, आमचं स्वप्न पूर्ण केलं; फडणवीसांचा उपरोधिक...

Lok Sabha 2024: शरद पवारांचे आभार, आमचं स्वप्न पूर्ण केलं; फडणवीसांचा उपरोधिक टोला

Subscribe

वर्ध्यातील भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारसभेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचे उपरोधिक भाष्य

वर्धा: शरद पवार यांचे मनापासून आभार. आम्हाला काँग्रेसमुक्त वर्धा करायचा होता. ते काही करता येत नव्हतं. पण, शरद पवार यांचे आभार त्यांनी पंजाला वर्ध्यातून हद्दपार करत आमचं स्वप्न पूर्ण केलं आहे, असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. देवेंद्र फडणवीस वर्ध्यातून बोलत होते. वर्ध्यातील भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारसभेदरम्यान त्यांनी उपरोधिक भाष्य करत महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. (Lok Sabha 2024 Devendra Fadnavis Thanked to Sharad Pawar For Wardha Loksabha Seat)

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? (Devendra Fadnavis latest News) 

शरद पवार या ठिकाणी येऊन गेले, मी शरद पवारांचे मनापासून आभार मानतो. जी गोष्ट आम्हाल जमली नाही ती शरद पवारांनी करून दाखवली. आम्ही काँग्रेसमुक्त वर्ध्याचा नारा दिला होता. आम्हाला पंजा इथून गायब करता आला नाही. वर्ध्यातून शरद पवारांनी पंजा गायब करून दाखवला. आमचं स्वप्न शरद पवार यांनी पूर्ण केलं. ज्या महात्मा गांधींचं नाव सांगून काँग्रेसने राजकारण केलं. त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवारांनी केलं त्यामुळे सगळ्यांनीच त्यांचे आभार मानले पाहिजेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काय अवस्था झाली आहे बघा, काँग्रेस वर्ध्यातून हद्दपार, महायुतीला इथे उमेदवार सापडेना. मग उमेदवाराचा शोध सुरू झाला. उमेदवार त्यांन काँग्रेसमधून आयात करावा लागला. त्यांना माहीत आहे की विधानसभेत आपला निभाव लागणार नाही. म्हणून लोकसभेचं तिकीट घेऊन आपलं नाव मोठं करावं, असं त्यांनी ठरवलं, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

महात्मा गांधींच वर्धा ना काँग्रेसच ना शरद पवारांचं. वर्धा भाजपाचं आहे. नरेंद्र मोदींचं आहे. हे आता शिक्कामोर्तब झालं आहे. रामदास तडस यांनी दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेत सातत्याने भूमिका घेतली. सामान्य लोकांमध्ये फिरले. त्यामुळे त्यांना जनतेचं विलक्षण प्रेम मिळालं. रामदास तडस हे पैलवान आहेत. आमच्या पैलवानाने असा डाव टाकला की शरद पवारांच्या हातून कुस्तीगीत परिषद निघाली. त्यांना सगळे डावपेच माहीत आहेत, चेहरा भोळा असला तरीही. असं म्हणत फडणवीसांनी टोलेबाजी केली.

- Advertisement -

(हेही वाचा: Lok Sabha : भाजपाने वापरून अडगळीत टाकलेली लोकं आपल्याला येऊन भेटतायत – उद्धव ठाकरे)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -