घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरLok Sabha 2024 : हर्षवर्धन जाधवांची लोकसभा लढण्याची घोषणा; महायुतीचे ठरेना, महाविकास...

Lok Sabha 2024 : हर्षवर्धन जाधवांची लोकसभा लढण्याची घोषणा; महायुतीचे ठरेना, महाविकास आघाडीचे काय होणार?

Subscribe

छत्रपती संभाजीनगर – औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात अपक्ष निडणूक लढवण्याची तयारी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केली आहे. तेलंगणातील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) मध्ये प्रवेश केलेले हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता. आता ते औरंगाबाद लोकसभेची अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या मतांमध्ये विभाजन होण्याची शक्यता आहे. महायुतीने अद्याप येथे उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर जाधवांचे आव्हान निर्माण झाल्यास निडणूक रंगतदार होण्याची चिन्ह आहेत.

कोण आहे हर्षवर्धन जाधव

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका सभेला संबोधित करताना माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार मी एकमेव आमदार आहे. सध्या मी देशोधडीला लागलो आहे. समाजाचं काम करणारा मी उमेदवार आहे. शेतकऱ्यांची कामे, पीक कर्ज, पीक विमा, शेतीसाठी पाणी यासाठी मी सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करत आलो आहे. मी अपक्ष लढणार आहे. तुम्हाला ज्यांना पाडायचे आहे त्यांना पाडा. ज्यांनी काम केले त्यांना निवडून आणा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

- Advertisement -

हर्षवर्धन जाधव हे जिल्ह्यातील कन्नड विधानसभेतून आमदार होते. आधी शिवसेना नंतर मनसे आणि आता बीआरएस असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. 2019 लोकसभेचीही त्यांनी निवडणूक लढवली होती. ट्रॅक्टर चिन्हावर निवडणूक लढलेल्या हर्षवर्धन जाधव यांना त्यावेळी 2,83,798 मते मिळाली होती. मराठा मतांचे ध्रुवीकरण करण्यात ते यशस्वी ठरले होते. चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात हिंदू मतांची विभागणी झाल्यामुळे एआयएमआयएम-वंचित बहूजन आघाडीचे इम्तियाज जलील यांचा विजय सुकर झाल्याचे तेव्हा बोलले जात होते.
त्यावेळी मराठा आंदोलन हे मराठवड्याच्या राजधानीत मोठ्या प्रमाणात सुरु होते, त्याचाही फायदा हर्षवर्धन जाधव यांना झाला होता. यंदा मनोज जरांगे कोणाला पाठिंबा देतात हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणूक रंगतदार होणार?

महाविकास आघाडीकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला हा मतदारसंघ सोडायचा हे अजून ठरत नाही अशी स्थिती आहे. मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील देखील यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यातच गेल्यावेळी जवळपास तीन लाख मते घेतलेले हर्षवर्धन जाधव पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी स्वतः जाहीर केल्यामुळे लोकसभा निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Lok Sabha 2024 : छ. संभाजीनगर लोकसभेसाठी शिंदे गट-भाजपचा दावा; ठाकरे गटातील दिलजमाई कोणाला पडणार भारी?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -