मुंबई : केंद्रामध्ये यावेळी देखील भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आल्यास देशातील लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल, असा दावा विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या नागौरमधील भाजपा उमेदवार ज्योती मिर्धा यांच्या एका वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. याचा व्हिडीओ शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा – Lok Sabha 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपाकडेच; नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात
आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे. भाजपाचे लोक चुकून किंवा अनवधानाने का होईना कधी कधी खरे बोलतात. राजस्थानमधील नागौर मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार ज्योती मिर्धा यांनीही भाजपाला संविधान बदलायचे असून त्यासाठी संसदेत मोठे बहुमत आवश्यक असल्याचे जाहीरपणे सांगून टाकले. आता भाजपा कोणत्या तोंडाने ही बाब नाकारणार? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
भाजपचे लोक चुकून किंवा अनवधानाने का होईना कधी कधी खरं बोलतात.. राजस्थानमधील नागौर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार ज्योती मिर्धा यांनीही भाजपला संविधान बदलायचं असून त्यासाठी संसदेत मोठं बहुमत आवश्यक असल्याचं जाहीरपणे सांगून टाकलं..
आता भाजप कोणत्या तोंडाने ही बाब नाकारणार? आज आपला… pic.twitter.com/MOyhGPxCeg
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 2, 2024
आज आपला देश हा केवळ आणि केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या पायावर उभा आहे, पण हेच संविधान बदलून भाजपा देशाचे तुकडे करण्याचं कारस्थान रचत आहे. म्हणूनच संविधान आणि लोकशाहीवर प्रेम असलेल्या प्रत्येकाने संविधानाच्या मुळावर उठलेल्या भाजपाचे मनसुबे उधळून लावण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – Ashish Shelar : पक्ष कोमात फक्त जाहिरात जोमात, आशिष शेलार यांचा काँग्रेसवर निशाणा
काय म्हणाल्या ज्योती मिर्धा?
ज्योती मिर्धा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. देशाच्या हितासाठी अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यासाठी आम्हाला अनेक संवैधनिक बदल करावे लागतात. त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांत ते मंजूर करणे आवश्यक असते. लोकसभेत भाजपाकडे प्रचंड बहुमत आहे. यावेळी रालोआला तिसऱ्यांदा लोकसभेत प्रचंड बहुमत मिळवायचे आहे, असे मिर्धा यांनी म्हटल्याचे या व्हिडीओत दिसते.
गेल्या वर्षी झालेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्योती मिर्धा यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला होता. यानंतर भाजपाने त्यांना लोकसभा निवडणुकीत नागौरमधून तिकीट दिले. येथे विरोधकांच्या इंडि आघाडीचे उमेदवार आणि आरएलपी प्रमुख हनुमान बेनिवाल यांच्याशी मुकाबला होणार आहे.
हेही वाचा – Thackeray group : स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, ठाकरे गटाच्या रडारवर मोदी सरकार