Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : लोकशाहीचा आदर राखत विचारांची लढाई लढू, प्रणिती शिंदेंचे...

Lok Sabha 2024 : लोकशाहीचा आदर राखत विचारांची लढाई लढू, प्रणिती शिंदेंचे सातपुतेंना पत्र

Subscribe

सोलापूर : भाजपाने काल, रविवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. यात सोलापुरातून राम सातपुते यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. सोलापुरात काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांना तिकीट देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियावर राम सातपुते यांना उद्देशून एक पत्र शेअर केले असून मी सोलापूरची लेक म्हणून तुमचे सोलापूरात स्वागत करते, असे आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मुख्यमंत्र्यांसमोरच नाशिकच्या हेमंत गोडसेंचे शक्तिप्रदर्शन, शिंदेंकडून शब्द

- Advertisement -

‘अब की बार चारसौ पार’ची घोषणा दिल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात आपला वरचष्मा ठेवण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे. भाजपाने काल, रविवारी जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्राचे तीन उमेदवार आहेत. भंडारा- गोंदियातून सुनील मेंढे, गडचिरोली येथून अशोक नेते आणि सोलापूर या राखीव मतदारसंघातून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियावर राम सातपुते यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. आपले सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारे शहर आणि जिल्हा आहे. इथे सर्वांना आपली मते मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचे सोलापूरात स्वागत करते. तसेच, या उमेदवारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळाली आहे, त्याबद्दल शुभेच्छा देते, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Chandrapur Loksabha 2024: चंद्रपुरात प्रतिभा धानोरकरांच्या नावावर शिक्कामोर्तब; वडेट्टीवारांचा पत्ता कट

लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असते. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्व असावे, असे माझे मत आहे. पुढील 40 दिवस याचे भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो, यावर लढाई लढू, अशी मी आशा करते, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा – Loksabha 2024: भाजपाची पाचवी यादी जाहीर; अभिनेत्री कंगना रणौतला मंडीमधून उमेदवारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -