घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : परभणीतून रासपच्या महादेव जानकरांना उमेदवारी; सुनील तटकरेंची घोषणा

Lok Sabha 2024 : परभणीतून रासपच्या महादेव जानकरांना उमेदवारी; सुनील तटकरेंची घोषणा

Subscribe

लोकसभेच्या परभणी मतदारसंघातून रासप पक्षाचे नेते महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ही जागा मित्रपक्ष असलेल्या रासपला देण्यात आली आहे.

मुंबई : लोकसभेच्या परभणी मतदारसंघातून रासप पक्षाचे नेते महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ही जागा मित्रपक्ष असलेल्या रासपला देण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घोषणा केली. (Lok Sabha 2024 Mahadev Jankar of nominated from Parbhani ncp leader Sunil Tatkare announcement)

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकताच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रासप नेते महादेव जानकर, राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे उपस्थित होते. या पत्रकार परिषदेदरम्यान सुनील तटकरे यांनी परभणी लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर यांनी उमेदवारी जाहीर केली.

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे?

“लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया संपली असून दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेस 28 मार्चपासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे जस-जसे टप्पे जवळ येत आहेत, तस-तशा चर्चा होऊन उमेदवारी जाहीर केले जात आहेत. दुसऱ्या टप्प्यात परभणी लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून हा मतदारसंघ राज्यातील महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या गोठातून आम्ही मित्रपक्ष असलेल्या रासप पक्षाचे नेते महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे”, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही जवळपास सात ते आठ जागा मागितल्या होत्या. त्यासंदर्भात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आम्ही मागितलेल्या जागांमध्ये परभणी लोकसभा मतदारसंघ होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या महायुतीतील प्रमुख पक्षांच्या बैठकीत झालेल्या चर्चेत तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर या मतदारसंघात रासप नेते महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला”, असेही सुनील तटकरे म्हणाले.

- Advertisement -

“आम्ही महादेव जानकर यांची आज महायुतीचे उमेदवार म्हणून घोषणा करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने हा निर्णय घेण्यापूर्वी परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या चर्चांनंतर ही उमेदवारी जाहीर करण्यात आली”, असे सुनील तटकरे यांनी सांगितले. तसेच, अतिशय चांगल्या मतांच्या फरकांनी महादेव जानकर यांचा विजय होईल आणि संसदेत आमच्या समवेत काम करण्यासाठी असतील”, असा विश्वासही तटकरेंनी व्यक्त केला.


हेही वाचा – Ambadas Danve : खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर दानवे संतापले, म्हणाले – मानहानीचा दावा करणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -