घर ठाणे Lok Sabha 2024 : शिवसेनेच्या जागा शिवसेनाच लढविणार; केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर श्रीकांत...

Lok Sabha 2024 : शिवसेनेच्या जागा शिवसेनाच लढविणार; केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

Subscribe

ठाणे : आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर रविवारी (4 जून) उल्हासनगरच्या दौऱ्यावर आले होते. यापूर्वी त्यांनी दोनदा कल्याण लोकसभा मतदार संघाचा दौरा केला आहे. भाजपच्या या मोर्चेबांधणीमुळे कल्याण लोकसभा मतदार संघावर भाजपा दावा ठोकणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेनेचे (शिंदे गटाचे) खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेची जागा शिवसेनाच लढवणार असून केंद्र आणि राज्याच्या नेतृत्वाने हे स्पष्ट केले आहे, असे त्यांनी विधान केले आहे. (Lok Sabha 2024 : Shiv Sena will contest the seat of Shiv Sena; Srikant Shinde’s reaction after Union Minister’s visit)

शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी कल्याण ग्रामीण मध्ये लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार उभा करणार असे कोण म्हणाले, त्याचे नाव घ्या. भाजप नेत्यांचे जे लोकसभा निहाय दौरे सुरू आहेत ते केंद्राकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आम्हाला काही त्रास नाहीप्रत्येक पक्षाला आपला पक्ष संघटना बांधण्याचा अधिकार आहे. भाजप त्यांची पक्ष संघटना बांधतेय. जिथे जिथे शिवसेनेचे खासदार आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचेच खासदार निवडणूक लढणार हे केंद्राच्या आणि राज्याच्या नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात दौरा करणारे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे माझे मित्र आहेत. ते जेव्हा जेव्हा दौऱ्यावर आले आहेत तेव्हा मी त्यांचे स्वागत केले आहे. त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.

- Advertisement -

निर्णय एकत्र बसून घेतला जाईल
श्रीकांत शिंदेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अनुराग ठाकूर म्हणाले की, कोणती जागा कोण लढवणार हे तुम्ही किंवा मी ठरवू शकत नाही, पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील. ती वेळ 2024 मध्ये येईल, आत्ता ती वेळ नाही आली. जर आम्ही सगळी कामं आणि विकास एकत्र करत आहोत, त्यामुळे हा निर्णय सुद्धा एकत्र बसून घेतला जाईल, असे श्रीकांत अनुराग ठाकूर यांनी केले. 

दरम्यान, दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामुळे कल्याण लोकसभा मतदार संघ कोणाच्या वाट्याला जाणार याची जोरदार चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, परंतु भाजपाने याठिकाणी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष मजबुती करणासाठी भाजपाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी रविवारी उल्हासनगरच्या दौऱ्यावर आले होते. यापूर्वी त्यांनी दोनदा कल्याण लोकसभा मतदार संघाचा दौरा केला आहे.

- Advertisement -

शिवसेना (शिंदे गट) व भाजपाची युती असल्याने कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा ठोकल्यास सध्याचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना ठाण्यातून निवडणूक लढवून भाजपला कल्याणची जागा देऊ शकते. श्रीकांत शिंदे सध्या कल्याण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून आपल्या मतदार संघातील विकास कामांवर त्यांनी भर दिला असल्यामुळे कल्याण मतदार संघावरील दावा श्रीकांत शिंदे सहजासहजी सोडणार नाहीत, असेच चित्र सध्या दिसून येत आहे.

 

- Advertisment -