घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामतीत सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर

Lok Sabha 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामतीत सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर

Subscribe

बारमती : राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचं लक्ष होतं. सुप्रिया सुळे या मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत. तर, अजित पवार गटाकडून येथे कोणाला संधी मिळतेय याची उत्सुकता सर्वांना होती. (Lok Sabha 2024 Sunetra Pawar has been announced as a candidate for Baramati by NCP)

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची पाच उमेदवारांची यादी जाहीर झाली. या यादीत बारामती मतदारसंघाचा समावेश असून येथून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा शरद पवार गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आली. त्यानंतर काही क्षणातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बारामतीतून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणून 2024 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होणार आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी “निवडणूक लढण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. शिवजयंतीच्या निमित्ताने मी काल (29 मार्च) मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुणे जिल्ह्याला भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले. दुसऱ्याच दिवशी माझी उमेदवारी जाहीर व्हावी, हा माझ्यासाठी सुवर्णक्षण आहे. हा माझा सर्वांत मोठा सन्मानच म्हणावा लागेल. जिथे जाईन तिथे लोकांचा प्रचंड उत्साह आणि प्रतिसाद आहे. त्या उत्साहाला पाहून वाटतं की ते दादांच्या पाठीशी उभे राहतील. जनतेने ठरवलं आहे की मला उमेदवारी द्यायची. आता जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे”, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.


हेही वाचा – Lok Sabha 2024 : नाशिकचा वाद सोडवण्यासाठी शिंदेंचा अजित पवारांना शिरूरचा प्रस्ताव; वाचा सविस्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -