घरमहाराष्ट्रLok Sabha 2024: आमच्या तर वाघाच्या गर्जना; ते नारा द्यायच्या लायकीचे...; राऊतांचा...

Lok Sabha 2024: आमच्या तर वाघाच्या गर्जना; ते नारा द्यायच्या लायकीचे…; राऊतांचा हल्लाबोल

Subscribe

त्यांना देऊ दे नारे आमच्या वाघाच्या गर्जना आहेत, राऊतांचा भाजपावर हल्लाबोल

मुंबई: अबकी बार 400 पार, राज्यात 45 पार… महायुती आणि भाजपाला कितीही नारे देऊ द्या. ते निवडणुकीनंतर नारा द्यायच्या लायकीचे राहणार नाहीत. पतंप्रधान मोदी तर इतके नारे देतात की त्यांच्या नाऱ्यांचं एक पुस्तक काढायला हवं. त्यांना देऊ दे नारे आमच्या वाघाच्या गर्जना आहेत, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवरही टीका केली. (Lok Sabha 2024 Thackeray Group MP Sanjay Raut Criticized BJP and Mahayuti)

भाजपाचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज अनेक पदाधिकाऱ्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावर राऊत म्हणाले की, त्यांच्या प्रवेशामुळे जळगाव लोकसभा अधिक रंगतदार आणि ठाकरे गटाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणारा हा पक्षप्रवेश आहे.

- Advertisement -

उन्मेष पाटील यांच्या प्रवेशाने जळगावचे शिवसेना ही मजबुतीने पुढे जाईल, त्यांची ताकद शिवसेनेची ताकद एकत्र येईल आणि जळगावात शिवसेनेचा खासदार या वेळेला प्रथमच जळगावमध्ये लोकसभेला निवडून येईल यांची आमच्या मनात शंका नाही, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

मोदींच्या नाऱ्यांचं एक पुस्तक काढायला पाहिजे

अब की बार 400 पार असा भाजपाचा नारा आहे. भाजपावाले फक्त नारेबाजी करत आहेत. आता काही दिवसांनी नारे देण्याच्या लायकीचा ही राहणार नाहीत. अखंड हिंदुस्तान करू, पाकव्याप्त काश्मीर हिंदुस्थानात आणू, चीनला धडा शिकवू, असे नारे नरेंद्र मोदी देत होते. त्यांचं काय झालं, असा सवाल विचारत त्यांच्या नाऱ्यांच एक पुस्तक काढायला पाहिजे, असा टोला राऊत यांनी हाणला. गर्जना आणि नारेबाजी यामध्ये खूप फरक आहे. आमच्या गर्जना आहेत आणि वाघाच्या डरकाळ्या आहेत. त्यामुळे त्यांना जेवढी नारेबाजी करायची तेवढी करू द्या, असंही संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

(हेही वाचा: Lok Sabha Election 2024 : उन्मेष पाटील ठाकरे गटात; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -