घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : जातीपातीत फूट पाडून कोणी राजकारण केले..., सातपुतेंचे प्रणिती...

Lok Sabha 2024 : जातीपातीत फूट पाडून कोणी राजकारण केले…, सातपुतेंचे प्रणिती शिंदेंना प्रत्युत्तर

Subscribe

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार म्हणून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या नावाची घोषणा होताच तिथे जोरदार राजकारण रंगले आहे. काँग्रेसच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पत्र शेअर करत लोकशाहीचा आदर करून विचारांची लढाई लढण्याचे आवाहन राम सातपुते यांना केले होते. तर, राम सातपुते यांनीही एका पत्राद्वारे प्रणिती शिंदे यांच्या पत्राला प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : लोकशाहीचा आदर राखत विचारांची लढाई लढू, प्रणिती शिंदेंचे सातपुतेंना पत्र

- Advertisement -

सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारे शहर आणि जिल्हा आहे. इथे सर्वांना आपली मते मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचे सोलापूरात स्वागत करते. तसेच, या उमेदवारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळाली आहे, त्याबद्दल शुभेच्छा देते, असे प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असते. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्व असावे, असे माझे मत आहे. पुढील 40 दिवस याचे भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो, यावर लढाई लढू अशी मी आशा करते, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : चंद्रपूरचा गड राखेन, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांना विश्वास

त्यानंतर आता राम सातपुते यांनीही एका पत्राद्वारे प्रणिती शिंदे यांना प्रत्युत्तर दिले आहे. मी 2019पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. आमदार झाल्यापासून ते आजतोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या, आणि त्यायोगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

मी ज्या भाजपाचा कार्यकर्ता आहे, तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत. समाजात धर्म, जातीपातीत फूट पाडून कोणी एवढी वर्षं राजकारण केले आहे, हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेने आता ओळखले आहे, असे त्यांनी या पत्राद्वारे प्रणिती शिंदे यांना सुनावले आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : भाजपाची घोडदौड महाराष्ट्रच रोखेल, विजय वडेट्टीवारांना विश्वास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -