Homeताज्या घडामोडीLok sabha : शाहू महाराजांना सन्मान मग उदयनराजेंचं काय? फडणवीसांचा मविआला सवाल

Lok sabha : शाहू महाराजांना सन्मान मग उदयनराजेंचं काय? फडणवीसांचा मविआला सवाल

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 साठी कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शाहू महाराजांना उमेदवारी घोषित केल्यानंतर शाहू महाराजांचा मान राखला जावा अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात आली. मविआच्या या मागणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दिल्ली : लोकसभा निवडणूक 2024 साठी कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शाहू महाराजांना उमेदवारी घोषित केल्यानंतर शाहू महाराजांचा मान राखला जावा अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात आली. मविआच्या या मागणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जर महायुतीने सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली तर, त्यांची ते बिनविरोध निवड करतील का, त्यांचाही सन्मान आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शाहू महाराजांची बिनविरोध निवड करण्याची महाविकास आघाडीची मागणी फेटाळली. (lok sabha devendra dadnavis talks on shahu maharaj udayanraje bhosale and Slams MVA)

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री हे दिल्लीत दाखल झाले आहेत. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना मविआची मागणी फेटाळली. त्यानुसार, “छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांचा मान राखला जावा अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, जर महायुतीने सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली तर, त्यांची ते बिनविरोध निवड करतील का, त्यांचाही सन्मान आहे. मग त्यांनी सांगावं की आम्ही त्यांची बिनविरोध निवड करू, कारण त्यांचाही सन्मान आहे. त्यामुळे शाहू महाराजांपासून सगळ्यांचा सन्मान आहे. पण हे राजकारण आहे. याआधीही त्यांच्या घराण्याने निवडणुका लढवलेल्या आहेत. याआधीही निवडणुका लढवलेल्या आहेत. अगदी एकमेकांविरोधात निवडणूका लढवलेल्या आहेत. त्यामुळे राजकारणात अशी मागणी होत असते”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आज सुटणार?

याशिवाय, दिल्लीत सुरू असलेल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत राज्यातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटणार अशी चर्चा आहे. याबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आमच 80 टक्के काम पूर्ण झालं असून 20 टक्के काम बाकी आहे. जे 20 टक्के काम बाकी आहे, ते आम्ही आज नाहीतर उद्यापर्यंत संपवू. तीन पक्षांमधील जी जागावाटप होणार आहे, ती सुद्धा पूर्ण करू. भाजपच्या वाट्याला ज्या जागा आहेत आणि ज्या अपेक्षित आहेत यासंदर्भातील मांडणी आम्ही CECला अगोदरच केलेली आहे. त्यामुळे आता सुटलेल्या जागा आहेत. त्यासंदर्भात लवकरच CEC निर्णय घेईल. ज्या सुटू शकतात त्याबाबत पुढच्या CECत किंवा अध्यक्षांना अधिकार दिले तर अध्यक्ष्यांच्या संमतीने त्या जागा घोषित होतील. आता आमच्यासमोर जास्त जागा शिल्लक नाहीत. तीन पक्षांमध्ये जे वाटप करायचे आहे. तेवढाच मुद्दा आमच्यासमोर आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अमित शाह आणि उदयनराजे भोसले यांची आज होणार भेट – फडणवीस

दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उदयनराजे भोसले इच्छुक आहेत. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी उदयनराजे भोसले हे तीन दिवसांपासून दिल्लीत असून त्यांची अद्याप अमित शाहांसोबत भेट झालेली नाही. मात्र “छत्रपती उदयनराजे भोसले यांची आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याशी भेट होईल. तेव्हा ते त्यांचे म्हणणं तिकडे मांडतील, त्यानंतर अंतिम निर्णय जो, असेल तो गृहमंत्री घेतील”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


हेही वाचा – AADITYA THACKERAY : साहजिकच उत्तीर्ण होऊनही…, ठाकूर कॉलेजच्या घटनेवरून आदित्य ठाकरेंचा टोला