घरमहाराष्ट्रजयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश

जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश

Subscribe

समाजवादी पार्टीच्या माजी खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

समाजवादी पार्टीच्या माजी खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपध्ये प्रवेश करुन त्यांनी भाजपचे आभार मानले असून ‘सिनेमा असो किंवा राजकारण असो, ते मी मनापासून स्वीकारले आहे. तसेच मी तेलगु देशमध्ये होते. नंतर चंद्राबाबू यांच्यासोबत काम केले. पुढे मी उत्तर प्रदेशात आले. येथे सपासोबत काम करण्याची संधी मिळाली. आज मला भाजपमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याचे सौभाग्य मिळाले, त्याबद्दल मी धन्यवाद देते’,असे जयाप्रदा म्हणाल्या.

रामपूरमधून आजम खान यांच्याविरोधात लढणार

मिळालेल्या माहितीनुसार, जर जयाप्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून रामपूरचे सपा उमेदवार आजम खान यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उरतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जयाप्रदा या रामपूरच्या खासदार राहिल्या आहेत. त्यांनी रामपूर मतदारसंघातून सपाकडून २००४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी या निवडणुकीत यशही मिळवले होते.

- Advertisement -

जयाप्रदा यांनी १९९४ मध्ये तेलगू देशम पार्टीतून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. तेलुगू देशम पार्टीचे संस्थापक एन टी रामाराव यांनी त्यांना पक्षात प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले होते. परंतु, जयाप्रदा यांचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्या तेलगू देशम पार्टीतून बाहेर पडल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -