घरमहाराष्ट्र'शिवसेना नाही तर निलेश राणेच विजयी', नारायण राणेंना पराभव अमान्य

‘शिवसेना नाही तर निलेश राणेच विजयी’, नारायण राणेंना पराभव अमान्य

Subscribe

कणकवलीत आमच्या उमेदवाराच्याच मतदारसंघात आम्हाला लीड नाही हे संशयास्पद आहे. या निकालावर निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा विचार करायचा की नाही यावर विचार करुन त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे मत नारायण राणेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे यांचा ज्येष्ठ पुत्र माजी खासदार निलेश राणे यांचा पराभव झाला असला तरी देखील हा पराभव आम्हाला मान्य नाही. शिवसेनेचे उमेदवार निवडून येणे हे संशयास्पद आहे. तसेच प्रत्येक राऊंडमध्ये सात ते आठ हजारांचा फरक दिसून आला आहे. त्यामुळे या मतदानाच्या फेऱ्यांमध्ये मोठी तफावत दिसून येत असल्याने हा पराभव नसून नैतिकदृष्ट्या निलेश राणेंचा विजय‘, असल्याचे नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे यांचा ज्येष्ठ पुत्र माजी खासदार निलेश राणे यांचा पराभव झाल्यानंतर राणेंनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यांनी या निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘तळकोकणात आम्ही हरलो असलो तरी आम्हाला हा पराभव मान्य नसल्याचे मत नारायण राणेंनी व्यक्त केले आहे. तसेच कोकणात सेनेचा उमेदवार निवडून येणे हे संशयास्पद आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीचा निकाल म्हणजे हेराफेरी असून निकालावर संशयाला जागा निर्माण होत असल्याची टीका नारायण राणेंनी केली आहे. तसेच कणकवलीत आमच्या उमेदवाराच्याच मतदारसंघात आम्हाला लीड नाही हे संशयास्पद आहे. या निकालावर निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा विचार करायचा की नाही यावर विचार करुन त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे मत देखील नारायण राणेंनी व्यक्त केले आहे. मात्र या पत्रकार परिषदेला रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार निलेश राणे स्वतः उपस्थितीत नव्हते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -