मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत मातब्बर नेते अजित पवार यांनी आपली वेगळी चूल मांडली. त्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. एक अजित पवार आणि शरद पवार गट. हा गट आता पवार कुटुंबीयांमध्येही दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहेत. काही सदस्य हे शरद पवारांच्या बाजूने तर काही अजित पवारांच्या बाजूने आहेत. अजित पवार यांच्या सख्ख्या भावाने त्यांची साथ सोडली आहे. परंतु शरद पवार यांचे नातेवाईक मात्र अजित पवार यांच्याबाजूने आहेत. तशी पाटीही त्यांनी आपल्या घराबाहेर लावली आहे. (Lok Sabha Election 2024 Ajit Pawar Sunetra Pawar are our family Pandurang pawar relatives of Sharad Pawar with Ajit Pawar)
एकीकडे अजित पवार यांच्या सख्ख्या भावाने साथ सोडली पण आता शरद पवार यांचे सावत्र थोरले बंधू अजित पवार यांच्या सोबतीला आले. त्यांनी घरावर बोर्ड लावत अजित पवार आणि सुनेत्रा पवार हेच आमचे कुटुंब असल्याचे म्हटलं आहे. काटेवाडीतील शरद पवार यांचे थोरले सावत्र बंधू पांडुरंग पवार यांनी अजित पवार यांना साथ दिली आहे.
पांडुरंग पवार कुटुंब पूर्ण ताकतीने अजित पवारयांच्याबरोबर उभे राहिले आहे. एकीकडे अजित पवार यांच्या कुटुंबातील सख्ख्या नात्यातील लोकांनी साथ सोडली असताना शरद पवार यांच्या सावत्र भावाच्या कुटुंबाने मात्र अजित पवारांच्या ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा: Loksabha Election 2024 : दिलेले निर्देश व्यवस्थित पाळा अन्यथा…सर्वोच्च न्यायालयाची अजित पवारांना तंबी)