घरमहाराष्ट्रLok Sabha 2024: आनंदराज आंबेडकरांकडून उमेदवारी मागे; वंचितला पाठिंबा देणार

Lok Sabha 2024: आनंदराज आंबेडकरांकडून उमेदवारी मागे; वंचितला पाठिंबा देणार

Subscribe

रिपल्बिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी मागे घेतली आहे.

अमरावती: रिपल्बिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी मागे घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. प्रकाश आंबेडकर आपल्याला पाठिंबा देतील अशी आनंदराज आंबेडकर यांना आशा होती, मात्र तसं काही झालं नाही. अखेर, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. (Lok Sabha Election 2024 Anandraj Ambedkar withdraws candidature Support the Vanchit Bahujan Aghadi)

रिपल्बिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी यासंदर्भात एक पत्रक जारी केलं असून याच पत्रकातून त्यांनी वंचितला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे लहान बंधू रिपप्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी 2 एप्रिलला अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली.

- Advertisement -

वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंब्याची मागणी केली होती. मात्र,वंचितने पाठिंबा न दिल्याने आनंदराज आंबेडकर यांनी माघार घेतली आहे.

माघार घेण्याचं कारण काय?

रिपल्बिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आज अमरावती लोकसभेसाठी अर्ज दाखल करणार होते. विशेष म्हणजे, वंचित बहुजन आघाडी अमरावतीत आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. सध्या असा काही निर्णय झालेला नाही.

- Advertisement -

वंचित आघाडीकडून आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर झाला नाही. त्यामुळे आनंदराज आंबे़डकरांनी स्वत:च आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे.

(हेही वाचा: Politics : …शिवाजी महाराजांनी दृष्टांत दिला; बारामतीचा पेच पुन्हा वाढला?)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -