घरमहाराष्ट्रAshish Shelar : 'पक्षप्रमुख' तेवढं म्हणा, आशिष शेलारांचा कवितेतून उद्धव ठाकरेंवर निशाणा

Ashish Shelar : ‘पक्षप्रमुख’ तेवढं म्हणा, आशिष शेलारांचा कवितेतून उद्धव ठाकरेंवर निशाणा

Subscribe

मुंबई : देशभरात सात टप्प्यांत लोकसभा निवडणूक होणार आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध विरोधकांच्या इंडि आघाडी अशी लढत होणार आहे. त्यामुळे आता आरोप-प्रत्यारोप टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष Adv. आशिष शेलार यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रसिद्ध ‘कणा’ या कवितेचा आधार घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024: आनंदराज आंबेडकरांकडून उमेदवारी मागे; वंचितला पाठिंबा देणार

- Advertisement -

राज्यात 2019मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय समीकरणे बदलली. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेत मोठी दरी निर्माण झाली. आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरोधकांच्या इंडियात सहभागी झाले आहे. हाच संदर्भ घेत आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

- Advertisement -

आमदार शेलार यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची क्षमा मागत ‘म्हणा’ या शीर्षकाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक कविता शेअर केली आहे.

हेही वाचा – Politics : …शिवाजी महाराजांनी दृष्टांत दिला; बारामतीचा पेच पुन्हा वाढला?

ओळखलंत का राहुलजी मला? मुंबईतून आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी
क्षणभर बसले, नंतर हसले बोलले वरती पाहून
काँग्रेसशी मैत्री केली, राम मंदिरावर अहंकारी टीका केली
गेला अख्खा पक्षच मला सोडून…
नेते गेले, चिन्ह गेले, नगरसेवक, शाखाप्रमुख पण गेले
दोन मुलगे आणि दोन मातोश्री तेवढेच पदरी वाचले
बोलक्या, संजयला घेऊन, राहुलजी, आता लोकसभा लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठले,
खोके नको राहुलजी, जरा एकटे एकटे वाटले
जमले तर…
सभेला चार कार्यकर्ते तेवढे पाठवा
दोन – चार जागा देऊन आमची इज्जत तेवढी वाचवा!
मोडला जरी पक्षाचा संसार
मोडला जरी गटाचा कणा
तुम्ही इज्जत देऊन, ‘पक्षप्रमुख’ तेवढं म्हणा!

हेही वाचा – Electricity tariff hike : सामान्यांच्या मासिक खर्चात दोन शून्यांची वाढ केली, ठाकरे गटाची भाजपावर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -