Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Lok Sabha election 2024 : लोकसभेसह विधानसभा निवडणुका? ठाकरे गटाचा दावा

Lok Sabha election 2024 : लोकसभेसह विधानसभा निवडणुका? ठाकरे गटाचा दावा

Subscribe

मुंबई : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha election 2024) वारे महाराष्ट्रासह देशात वाहू लागले आहेत. यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसह (BJP) विरोधकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. पुढील वर्षी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकही होणार आहे. तथापि, त्यांच्या कामाची गती आणि तयारी पाहता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रच घेतल्या जातील, असे संकेत मिळाले असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – आगामी काळात महाराष्ट्रात लोकसभेचे 82 मतदारसंघ होणार, देशातील पाचवं सीमांकन होऊ शकते?

- Advertisement -

सन 2024मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय तसेच राज्य निवडणूक आयोग (Election Commission) आतापासूनच कामाला लागला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील प्रत्येक राज्यामधील निवडणूक अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीवर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीसंदर्भातील कामांव्यतिरिक्त इतर कोणतेही काम देऊ नका, असे आदेश देण्यात आले असल्याचे ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकात म्हटले आहे.

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील जिह्यांमध्ये दौरा करून राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे प्रांताधिकारी, तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. त्याचबरोबर मतदान केंद्रे, तेथील व्यवस्था आदींचा आढावा घेऊन त्यांनी तिथे काय बदल करणे आवश्यक आहे तसेच निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणकोणत्या कामांना प्राधान्य द्यावे यासंदर्भात सूचना केल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – New parliament : …तर शोभेचा राजदंड काय कामाचा? ठाकरे गटाचा बोचरा सवाल

विशेषत:, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. राज्यात 2014 मध्ये एकूण 8 कोटी 7 लाख 98 हजार 823 तर 2019 मध्ये 8 कोटी 73 लाख 30 हजार 484 मतदार होते. यंदा ती संख्या 9 कोटी 8 लाखांवर पोहोचली आहे. तर आता हा टक्का आणखी वाढविण्याच्या दृष्टीने 18 वर्षे पूर्ण होत असलेल्या तरुण-तरुणींची मतदार नोंदणी (voter registration) करण्यासाठी जून महिन्यात महाविद्यालयांमध्ये विशेष नोंदणी मोहीम राबवण्यात येणार आहे. यापूर्वी या तरुण-तरुणींची नोंदणी 1 जानेवारीपर्यंतच केली जात होती. यंदा प्रथमच ती मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यांमध्येही करण्यात येणार आहे.

- Advertisment -