घरमहाराष्ट्रPolitics : ...शिवाजी महाराजांनी दृष्टांत दिला; बारामतीचा पेच पुन्हा वाढला?

Politics : …शिवाजी महाराजांनी दृष्टांत दिला; बारामतीचा पेच पुन्हा वाढला?

Subscribe

लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ चर्चेत आहे. कारण याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहेत. अर्थात नणंद आणि भावजय यांच्यात लढत होणार आहे. तर काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते विजय शिवतारे हे बारामतीतून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होत मात्र आता त्यांनी माघार घेतली आहे. असे असले तरी आता प्रा. नामदेव जाधव यांनी आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. छत्रपत्री शिवाजी महाराजांनी स्वप्नात येऊन आपल्याला ही निवडणूक लढवण्याचा दृष्टांत दिल्याचं प्रा. नामदेव जाधव यांनी म्हटलं आहे.

बारामती : लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ चर्चेत आहे. कारण याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहेत. अर्थात नणंद आणि भावजय यांच्यात लढत होणार आहे. तर काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते विजय शिवतारे हे बारामतीतून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते मात्र आता त्यांनी माघार घेतली आहे. असे असले तरी आता प्रा. नामदेव जाधव यांनी आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. छत्रपत्री शिवाजी महाराजांनी स्वप्नात येऊन आपल्याला ही निवडणूक लढवण्याचा दृष्टांत दिल्याचं प्रा. नामदेव जाधव यांनी म्हटलं आहे. (Lok Sabha Election 2024 Baramati Constituency Namdev Jadhav will contest election Shivaji Maharaj gave a vision)

हेही वाचा – Lok Sabha : ठाकरेंचा प्रस्ताव फेटाळत राजू शेट्टींकडून ‘एकला चलो रे’चा नारा; कारणंही स्पष्ट केलं

- Advertisement -

नामदेवराव जाधव हे प्राध्यापक, लेखक आणि व्याख्याते आहेत. ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरू’ हे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. जाधव हे आपण जिजाऊंचे वंशज असल्याचा दावा करतात. मागील काही दिवसांपूर्वी नामदेव जाधव यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. तसेच मराठा समाजावर शरद पवारांनी अन्याय केला असल्याचंही त्यांनी वक्तव्य केलं होतं. शरद पवार यांच्याबद्दल मागील काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह वक्तव करत असल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रा. नामदेव जाधव यांना काळं फासलं होतं. त्यामुळे ते चर्चेत आले होते. यानंतर आता त्यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर त्यांनी शिवाजी महाराजांनी दृष्टांत दिल्यामुळे निवडणूक लढवणार असल्याचा अजब दावा केल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर बोलताना प्रा. नामदेव जाधव म्हणाले की, बारामती मतदारसंघ हा शहाजी राज्यांच्या जाहगिरीचा प्रदेश आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या निर्मितीचं केंद्रबिंदू आहे. इथेच महाराजांनी शपथ घेतली. पहिला किल्ला ताब्यात घेतलेला तोरणा किल्लादेखील इथेच आहे. संभाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेला पुरंदर किल्लादेखील याच मतदारसंघात आहे. परंतु इथल्या कोणत्याही किल्ल्यांचा विकास झालेला नाही. या किल्ल्यांचा विकास व्हावा, अशी माझी इच्छा आहे. त्याबाबत विचार करत असतानाच शिवाजी महाराजांची पुण्यतिथी असलेल्या दिवशी म्हणजेच 3 एप्रिलला पहाटे महाराजांनी माझ्या स्वप्नात येऊन निवडणूक लढवण्याचा दृष्टांत दिला, असा दावा प्रा. नामदेव जाधव यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024: आनंदराज आंबेडकरांकडून उमेदवारी मागे; वंचितला पाठिंबा देणार

दरम्यान, बारातमीजवळ असलेल्या 4 किल्ल्यांवर जाणारे हायवे, रोपवे आणि हेलिपॅड असावं. असं केल्यास 4 लाख तरुणांना रोजगार मिळेल. यामुळे बारामती मतदारसंघात कोणीही बेरोजगार राहणार नाही. हे सगळं शिवाजी महाराजांनी साडेचारशे वर्षांपूर्वी तयार करून दिलं आहे, असंही नामदेव जाधव म्हणाले. मात्र जाधव यांच्यात बोलण्यात किती सत्य आहे, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. कारण ते प्रसिद्धीसाठी काही बोलतात, अशी टीकाही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर होत असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -