घरमहाराष्ट्रSupriya Sule : IIT मध्ये शिकूनही...; बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंनी पुन्हा सरकारवर...

Supriya Sule : IIT मध्ये शिकूनही…; बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंनी पुन्हा सरकारवर साधला निशाणा

Subscribe

बारामती : लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ चर्चेत आहे. कारण याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहेत. अर्थात नणंद आणि भावजय यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे काहीही झालं तरी आमचाच विजय होणार, असं कधीकाळी एकाच पक्षात असलेले नेते सध्याच्या प्रचाराच्या काळात वक्तव्य करताना दिसत आहेत. याचदरम्यान, बेरोजगारी आणि घराणेशाहीच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. (Lok Sabha Election 2024 Baramati Constituency Supriya Sule government on the issue of unemployment)

हेही वाचा – Sangli Constituency : सांगली आमचीच, उद्यापासून ठाण मांडून बसणार; संजय राऊतांची प्रतिक्रिया

- Advertisement -

जेजुरीत प्रचारादरम्यानदेखील सुप्रिया सुळेंनी बेरोजगारीच्या मुद्द्यावर पुन्हा भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटले की, गेले अनेक आठवडे आपण सगळे केंद्र सरकारचे सर्व्हे आणि माहिती पाहत आहोत. गेले दीड-दोन वर्षांचा कोरोना काळ आपण समजू शकतो. मात्र अद्यापही पूर्णपणे बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला नाही. IIT आणि IIM मध्ये शिकलेल्या तरुणांसमोर नोकरीचं मोठं आव्हान आहे. या मुलांपैकी 34 टक्के तरुणांना नोकऱ्या मिळत नाही आहे. ही बाब चिंताजनक आहे. आयआयटीसारख्या किंवा उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांसमोर जर बेरोजगारीचं संकट असेल तर सर्वसामान्य जनतेने करायचं काय? असा प्रश्न उपस्थित करत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – Lok Sabha : ठाकरेंचा प्रस्ताव फेटाळत राजू शेट्टींकडून ‘एकला चलो रे’चा नारा; कारणंही स्पष्ट केलं

- Advertisement -

बारामती लोकसभा मतदारसंघात नवा पेच

नणंद आणि भावजय यांच्यात लढत होत असल्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते विजय शिवतारे हे बारामतीतून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते मात्र आता त्यांनी माघार घेतली आहे. असे असले तरी आता प्रा. नामदेव जाधव यांनी आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता बारामतीत नवा पेच निर्माण झाला आहे. कारण नामदेव जाधव तेच आहेत जे शरद पवारांवर वारंवार टीका करत असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -