घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : भावना गवळी करणार बंडखोरी? तिकीट कापल्यानंतर घेतली आक्रमक...

Lok Sabha 2024 : भावना गवळी करणार बंडखोरी? तिकीट कापल्यानंतर घेतली आक्रमक भूमिका

Subscribe

भावना गवळी यांना यवतमाळ-वाशिम लोकसभेतून उमेदवारी न देता या लोकसभेतून मुख्यमंत्र्यांनी राजश्री पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे. पण यामुळे आता खासदार भावना गवळी यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा धक्का दिला आहे. गवळी यांना त्यांच्या लोकसभेतून उमेदवारी न देता या लोकसभेतून मुख्यमंत्र्यांनी राजश्री पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे. पण यामुळे आता खासदार भावना गवळी यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना गवळी यांनी त्या लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याचे सांगिकतले आहे. त्यामुळे भावना गवळी राजश्री पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करणार का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. (Lok Sabha Election 2024 Bhavana Gawli is likely to rebel in Yavatmal Washim Constituency)

हेही वाचा… Shiv Sena : शिवसेनेकडून हिंगोली मतदारसंघात बाबूराव कदम कोहळीकर तर, हेमंत पाटीलांची उमेदवारी रद्द

- Advertisement -

यवतमाळ-वाशिम लोकसभेतून भावना गवळी यांना तिकीट न देता शिवसेनेचे हिंगोलीतील नेते हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या भावना गवळी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत म्हणाल्या की, सर्वेक्षणाचा निकाल काहीही असो पण मी गेल्या अनेक वर्षांपासून यवतमाळ वाशिममधून निवडून येत आहे. या मतदारसंघात माझी मोठी ताकद आहे. त्यामुळे मी पुन्हा यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊ शकते.

तसेच, मी यवतमाळ-वाशिम मतदारसंघावरील दावेदारी अद्याप सोडलेली नाही. मी आता माझ्या मतदारसंघामध्ये परत जात आहे. मी यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, असे खासदार भावना गवळी यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. ज्यामुळे आता भावना गवळी या महायुतीच्या अधिकृत उमदेवार राजश्री पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करुन अर्ज भरणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भावना गवळी यांनी खरोखरच अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यास राजश्री पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.

- Advertisement -

भावना गवळी या गेल्या काही तासांपासून लोकसभेच्या उमेदवारीसाठी मुंबईत ठाण मांडून होत्या. तरीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट न घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी नागपूरमध्ये थेट देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न फोल ठरल्याचेच आता पाहायला मिळत आहे. त्यामुळे भावना गवळी आता काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 Bhavana Gawli is likely to rebel in Yavatmal Washim Constituency

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -