घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : त्यांना बाळासाहेबांचे विचार नको, फक्त पैसा पाहिजे; मुख्यमंत्री...

Lok Sabha 2024 : त्यांना बाळासाहेबांचे विचार नको, फक्त पैसा पाहिजे; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

Subscribe

त्यांना शिवसेना, बाळासाहेब, धनुष्यबाण, बाळासाहेब ठाकरेंचे विचार नको, त्यांना फक्त पैसे पाहिजेत. म्हणूनच त्यांनी शिवसेनेच्या खात्यातील जनतेचे आणि शिवसैनिकांचे 50 कोटी रुपये रुपये काढून घेतले, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

मुंबई : त्यांना शिवसेना, बाळासाहेब, धनुष्यबाण, बाळासाहेब ठाकरेंचे विचार नको, त्यांना फक्त पैसे पाहिजेत. म्हणूनच त्यांनी शिवसेनेच्या खात्यातील जनतेचे आणि शिवसैनिकांचे 50 कोटी रुपये रुपये काढून घेतले, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसेच, महाविकास आघाडीमध्ये सावळा गोंधळ आहेच, पण शिवसेना ठाकरे गटात पण सावळा गोंधळ असल्याचे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली. (Lok Sabha Election 2024 CM Eknath Shinde Slams Uddhav Thackeray)

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्या पक्षात विविध पक्षातून अनेक कार्यकर्ते नेतेमंडळी पक्षप्रवेश करत आहेत. त्यानुसार, आजही शिवसेनेत अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. “राज्य सरकारचे सुरू असलेले काम अतिशय उत्तमरित्या सुरू आहे. त्यामुळे सर्वजण शिवसेनेत येत आहेत. शिवसेना पक्षाचे कामही योग्य पद्धतीने सुरू असल्यामुळे सर्वजण सोबत येत आहेत. यामध्ये एवढंच आहे की, या सर्व लोकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मिळणारी वागणूक आणि शिवसेनेत मिळणारी वागणूक कारणीभूत ठरत आहेत. विकास हाच आमचा अजेंडा आहे. मागील दोन वर्षांत आम्ही केलेल काम समोर आहे. 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले कामही समोर असून, लोकं प्रभावित होत आहेत आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

“ज्यांना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचे विचार पटतात, ते सगळे सोबत येत आहेत. आमचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे कोणी मोठा नाही किंवा कोणी छोटा नाही. इथे कोणी मालक नाही आणि नोकर नाही. पण तिकडे (उबाठा) मालक-नोकराप्रमाणे वागवत होत होते. बाळासाहेब ठाकरे सहकाऱ्यांना सवंगडी समजत होते. पण आता आहेत ते सहकाऱ्यांना घरगडी समजतात. हाच फरक आहे”, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली.

महाविकास आघाडीसह उबाठामध्येही सावळा गोंधळ

शिवसेना ठाकरे गटाकडून ठाणे लोकसभा मतदारसंघात वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण आता ठाणे मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून दोन फॉर्म आल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. “महाविकास आघाडीमध्ये सावळा गोंधळ आहेच, पण शिवसेना ठाकरे गटात पण सावळा गोंधळ आहे. त्यामुळे एका उमेदवाराला एबी फॉर्म दिल्यानंतर त्याचा प्रचार चालू झाल्यनंतर दुसरा उमेदवार अर्ज भरतो आणि त्यालाही एबी फॉर्म दिला जातो. त्यालाच पक्षातील गोंधळाची स्थिती म्हणतात. तसेच, संभ्रमाची स्थिती म्हणतात. त्यांच्या जिंकण्यासाठी विश्वास नाही आहे. पण आमच्याकडे जिंकण्यासाठी विश्वास आहे”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.

- Advertisement -

हेही वाचा – VBA Vs Congress: काँग्रेसचा न्यायाशी काय संबंध? प्रकाश आंबेडकारांनी 2016 मधील मुद्दा उपस्थित करुन घेरले

‘कल्याण लोकसभा मतदारसंघ हा पूर्णपणे कायापालट झालेला मतदारसंघ होईल’

“कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांनी 10 वर्ष केलेले काम लोकांच्या समोर आहे. प्रत्येकाला भेटणं त्यांच्या अडचणी सोडवणे याकडे त्याचे लक्ष असते. कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघात अनेक विकासकाम करण्यात आली आहेत. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघ हा पूर्णपणे कायापालट झालेला मतदारसंघ होईल आणि राहिलेली कामं पूर्ण होतील, असा विश्वास लोकांमध्ये आहे. त्यामुळे अर्ज भरताना सर्वत्र महायुतीचे कार्यकर्ते दिसत होते आणि त्यांनी पुन्हा एकदा श्रीकांत शिंदेंना विजयी करत त्यांची हॅटट्रीक करण्याचा लोकांनी निर्णय घेतला आहे”, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

“खरी शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे. हे बरोबर आहे. ज्यांनी सत्तेसाठी आणि खूर्चीसाठी बाळासाहेबाचे विचार, आचार, भूमी सोडली, ते कधीच खरी शिवसेना होऊ शकत नाहीत. त्यांना शिवसेना, बाळासाहेब, धनुष्यबाण, बाळासाहेब ठाकरेंचे विचार नको, त्यांना फक्त पैसे पाहिजेत. म्हणूनच त्यांनी शिवसेनेच्या खात्यातील जनतेचे आणि शिवसैनिकांचे 50 कोटी रुपये रुपये काढून घेतले. हा त्यांचा स्वभाव आधी जो खूर्चीसाठी दिसत होता, आता पैशासाठी दिसतो आहे”, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.


हेही वाचा – Baramati : मोदी-शहांसोबत मी कशा गप्पा मारतो हे पुण्यातील सभेत दिसले; अजित पवारांचे भावनिक न होण्याचे पुन्हा आवाहन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -