घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : जोपर्यंत सांगलीचा तिढा सुटत नाही तोपर्यंत..., विश्वजित कदम...

Lok Sabha 2024 : जोपर्यंत सांगलीचा तिढा सुटत नाही तोपर्यंत…, विश्वजित कदम यांचा काँग्रेसला घरचा आहेर

Subscribe

सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली असून काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी पक्षाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, अद्यापही महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. अशातच आता सांगली लोकसभेच्या जागेवरून मविआत वादाची ठिणगी पडणार असल्याचे बोलले जात आहे. कारण या लोकसभेतून शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली असली तरी काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम देखील या जागेवर आपला दावा करून आहेत. ज्यामुळे याच मुद्द्यावरून आता विश्वजीत कदम यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. “जोपर्यंत सांगलीचा तिढा सुटत नाही तोपर्यंत आपण काँग्रेसच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नाही,” असे विश्वजीत कदम यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. (Lok Sabha Election 2024 Congress MLA Vishwajeet Kadam aggressive stance against the party from Sangli constituency)

हेही वाचा… Lok Sabha Election 2024: वंचितचा काँग्रेसला कोल्हापूर, नागपूर तर बारामतीत सुप्रिया सुळेंना पाठिंबा

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या जागेवरून तिढा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. सांगलीची जागा ही काँग्रेसलाच मिळावी आणि त्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल, असे काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्याकडून याआधीच सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता याबाबतची पुन्हा आठवण करून देण्यासाठी कदम यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.

काय आहे विश्वजीत कदम यांचे पत्र?

नाना गावंडे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांचे दिनांक 30 मार्च रोजीचे काँग्रेस राज्य प्रचार समितीच्या निवडीचे व बैठकीचे पत्र मला मिळाले. आपण माझी प्रचार समितीच्या सदस्यपदी निवड केली त्याबद्दल मी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेजी, महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथलाजी आणि आपला मनापासून आभारी आहे. राज्यात आगामी लोकसभा निवडणूक ही काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी म्हणून आपण सर्वजण ताकदीने लढवणारच आहोत. माझी आणि सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची सांगली लोकसभेच्या जागेबाबतीत असणारी भावना आपण जाणत आहात.

गेल्या काही दिवसांपासून सांगली व राज्यातील इतर काही लोकसभेच्या जागांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. काँग्रेस पक्ष सांगली लोकसभेची जागा लढवण्यास सक्षम आहे. या भूमिकेवरती मी व सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते आज ही ठाम आहे. तसेच अद्याप ही सांगली लोकसभा जागेबाबतीत काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीने एकत्रितपणे आम्हाला कोणताही निर्णय कळविलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता व आमदार म्हणून मी या बैठकीस अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. आपण दिलेल्या संधीबद्दल मी आपला आभारी आहे, असे स्पष्टपणे आमदार विश्वजीत कदम यांनी आपल्या पत्रातून काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळवले आहे.

सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून ही जागा आम्हाला मिळावी अशी मागणी काँग्रेसची होती. त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी गेल्या पाच वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या जागेसाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी ती घेईन अशी भूमिका विश्वजित कदम यांनी घेतली आहे. पण आता या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना आधीच उमेदवारी जाहीर केल्याने सांगलीतील काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाने दिलेला हा उमेदवार मविआचा अधिकृत उमेदवारी आहे की नाही, याबाबत आता प्रश्न उपस्थित झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Congress : अशी नरमाईची भूमिका परराष्ट्रमंत्र्यांना शोभत नाही, चीनप्रकरणी काँग्रेस आक्रमक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -