घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : भिवंडीची जागा राष्ट्रवादी शरद पवारांनीच राखली; पंकजा मुंडेंना...

Lok Sabha 2024 : भिवंडीची जागा राष्ट्रवादी शरद पवारांनीच राखली; पंकजा मुंडेंना बजरंग सोनवणेंचे आव्हान

Subscribe

Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून बीड आणि भिवंडी या दोन लोकसभेतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून दोन लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भिवंडीची जागा स्वतःकडे ठेवण्यास यश आले आहे. तर बीड लोकसभेतून भाजपाच्या पंकजा मुंडे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बजरंग सोनवणेंचे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे आता बीड आणि भिवंडी या दोन्ही लोकसभांमध्ये भाजपा वि. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. (Lok Sabha Election 2024 NCP-SP Second list of candidates announced)

- Advertisement -

भिवंडी लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्षात रस्सीखेच सुरू होती. भिवंडीची जागा काँग्रेसलाच मिळावी, असा आग्रह येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये भिवंडीतून काँग्रेसच्या उमेदवाराला लक्षणीय मते मिळाली होती. त्यामुळे काँग्रेस पक्ष भिवंडी मतदारसंघावरील दावा सोडायला तयार नव्हता.

हेही वाचा… Jitendra Awhad : भारताच्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीला हे शोभणारे नाही, आव्हाडांचा आरएसएसवर निशाणा

- Advertisement -

मात्र, या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्यासारखा प्रभावी उमेदवार असल्यामुळे ही त्यांच्याच पक्षाला मिळावी, असा आग्रह राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता. त्यामुळे या जागेवरून सुरू असलेला वाद टोकाला गेला होता. ज्यामुळे ही जागा नेमकी कोणाला मिळते, याकडेही सर्वांचे लक्ष होते. त्यामुळे आता ही जागा शरद पवारांना त्यांच्याकडे राखण्यात यश आले आहे.

तर, बीड लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडेच होता. ज्यामुळे या मतदारसंघातून अनेक जणांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यापैकी ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे या दोघांची नावे आघाडीवर होती. पण शरद पवारांनी आपल्या चाणक्यनितीने 2019 ला बीड लोकसभेत प्रीतम मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढलेल्या बजरंग सोनवणे यांनाच उमेदवारीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा… Navneet Rana : सुप्रीम कोर्टाने जातप्रमाणपत्र ठरवले वैध, नवनीत राणांची उमेदवारी अबाधित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -