Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : भाजपाच्या मोठ्या नेत्याला शरद पवारांचा फोन, आंबेडकरांनी विचारले...

Lok Sabha 2024 : भाजपाच्या मोठ्या नेत्याला शरद पवारांचा फोन, आंबेडकरांनी विचारले कारण

Subscribe

चार दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी भाजपाचे नेते राजनाथ सिंह यांना फोन केला होता, अशी माहिती प्रकाश आंबेडकरांकडून देण्यात आली. या फोनमागचे कारण शरद पवारांनी स्पष्ट करावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

मुंबई : राज्यात आज मंगळवारी (ता. 07 मे) तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. बारामतीसह राज्यातील 11 लोकसभेत हे मतदान झाले. पण यावेळी सर्वाधिक चर्चा झाली ती बारामती लोकसभेची. बारामती लोकसभेत पवार कुटुंबियांमध्येच लढत आहे. त्यामुळे 04 जूनला या मतदारसंघाचा निकाल काय लागतो? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. महायुतीने या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर मविआने विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनाच उमेदवारी दिली. तर सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने वंचित बहुजन आघाडीने या लोकसभेत आपला उमेदवार न देता त्यांनी सुळेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. परंतु, आता या वंचितने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Lok Sabha Election 2024 Prakash Ambedkar claims that Sharad Pawar called BJP leader Rajnath Singh)

वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांबाबत गौप्यस्फोट करत म्हटले की, चार दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी भाजपाचे नेते राजनाथ सिंह यांना फोन केला होता. आजारी असताना आणि निवडणुकीच्या काळात कोणी असा एकमेकांना फोन करतं का? असा प्रश्नही यावेळी त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. त्यामुळे राजनाथ सिंह यांच्यासोबत शरद पवार यांचे काय बोलणे झाले आहे हे आम्ही विचारू इच्छितो, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : तुमचा बुरशी आलेला माल आम्ही…; मोदींच्या एक्सपायरी डेटच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर

याबाबत प्रकाश आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले की, राष्ट्रवादीच्या 5 जागांसंदर्भात चर्चा झालीय का? किंवा एकनाथ शिंदे मुंबईच्या तीन जागा लढत आहेत, त्यासंदर्भात चर्चा झालीय का? किंवा उद्धव ठाकरे यांच्याबाबत चर्चा झाली आहे का?, ऐन निवडणुकीत फोन का करण्यात आला? याचा खुलासा केला गेला पाहिजे, अशी मागणी आंबेडकरांकडून करण्यात आली आहे. उत्तरे देताना कोणतीही बालबोध उत्तर देऊ नका, खरे कारण काय हे त्यानी सांगावे, असे थेटपणे आंबेडकरांनी म्हटले आहे.

- Advertisement -

त्याशिवाय, आम्हाला ज्या शंका आहेत त्या आम्ही सांगितल्या. कॉल केला की नाही त्यांनी सांगावे. पुढे आम्ही काय ते बोलू, असेही आंबेडकरांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. निवडणुकीत असे फोन केले जात नाही. त्याचे वेगळे अर्थ निघतात. त्यामुळे शरद पवार यांनी खुलासा करावा. मुंबईत एकनाथ शिंदे यांना मदत करण्यासाठी फोन केला का?, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. महत्त्वाची बाब म्हणजे, सुप्रिया सुळे यांच्यासाठी आंबेडकरांनी वंचितचा उमेदवार बारामती लोकसभेत उभा केला नाही. सुळेंसाठी ते त्यांच्या पाठिशी उभे राहिले. इतकेच नाही, तर त्यांच्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी सुळेंच्या विजयासाठी काम करायला सांगितले होते, असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

हेही वाचा… Amol Mitkari : आशाताईंसोबत सेल्फी न घेतल्याबद्दल आभार, मिटकरींचा सुप्रिया सुळेंना टोला


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -