Homeमहाराष्ट्रLok Sabha Election 2024 : 80 कोटींची मालमत्ता तर, 39 कोटींची उसनवारी;...

Lok Sabha Election 2024 : 80 कोटींची मालमत्ता तर, 39 कोटींची उसनवारी; विदर्भातील उमेदवाराचे शपथपत्र

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पाच जागांसाठी मतदान होणार आहे. या जागा विदर्भातील असून त्यातील एका उमेदवाराने अर्जसोबत निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे तब्बल 80 कोटी रुपयांची मालमत्ता असून त्यात 39 कोटी हे उसने घेतले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – Lok Sabha : भाजपाने वापरून अडगळीत टाकलेली लोकं आपल्याला येऊन भेटतायत – उद्धव ठाकरे

विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर येथे येत्या 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यापैकी चंद्रपूरमध्ये भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून राजेश बेरे अशी लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज सादर करताना प्रतिभा धानोरकर यांनी आपल्याकडे एकूण 80 कोटी 37 लाख रुपयांची संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. 55 कोटी रुपयांहून अधिक रुपयांचे कर्ज असून यात गृह, व्यवसाय तसेच वाहन खरेदी यासाठी बँकांकडून 15 कोटी 44 लाख 85 हजार रुपयांच्या कर्जाचा समावेश असून 39 कोटी रुपये तात्पुरते कर्ज म्हणून घेतले आहे.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : उन्मेष पाटील ठाकरे गटात; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

विशेष म्हणजे, तात्पुरते कर्ज खासगी कंपन्या, विविध व्यावसायिक यांच्यासह दीर, सासरे तसेत अन्य कुटुंबीयांकडून घेतले असल्याचे त्यांनी निवडमूक आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रात नमूद केले आहे. बांधकाम कंपनी तसेच एका व्यक्तीकडून प्रत्येकी दीड कोटी रुपये, ट्रान्सपोर्ट कंपनीकडून 61 लाख, अन्य एका व्यक्तीकडून 85 लाख तर, किराण स्टोअरकडून 80 लाख रुपये तात्पुरते कर्ज म्हणून घेतल्याची नोंद आहे.

गड कायम राखण्याचा निर्धार

आपले पती बाळू धानोरकर यांनी सर केलेला हा गड या लोकसभा निवडणुकीत कायम राखेन, असा विश्वास प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला आहे. भाजपाकडून सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपुरातून निवडणूक रिंगणात उतरविले आहे. त्यांच्याबद्दल प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नेते आहेत. त्यामुळे ही लढाई सोपी नाही. पण तरीही माझ्यासाठी ही लढाई हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी आहे, असे त्यांनी यापूर्वीच म्हटले आहे.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींना पर्याय कोण? विचारताच शशी थरूर म्हणाले…