Homeमहाराष्ट्रLok Sabha 2024: ठाकरेंना नकली संतान म्हणणारे औरंगजेबाचे वंशज; राऊतांचा थेट पंतप्रधानांवर...

Lok Sabha 2024: ठाकरेंना नकली संतान म्हणणारे औरंगजेबाचे वंशज; राऊतांचा थेट पंतप्रधानांवर हल्ला

Subscribe

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. ठाकरेंना नकली संतान म्हणणारे हे औंरगजेबाचे वंशज आहेत

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रचारसभेदरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना नकली संतान म्हटलं होतं. त्यावरुन आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे गटात या विधानाविरोधात प्रचंड संताप आहे. याबाबत बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. ठाकरेंना नकली संतान म्हणणारे हे औंरगजेबाचे वंशज आहेत, असा हल्लाबोल राऊतांनी पंतप्रधानांवर केला आहे. ते पत्रकारांशी संवाद साधत होते. (Lok Sabha Election 2024 Sanjay Raut Criticized Pm Narendra Modi on Nakali Santan statement)

ठाकरेंवर केलेली टीका अत्यंत दळभद्री

बुधवारी तेंलगणातील एका प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी उद्धव टाकरेंचा उल्लेख बाळासाहेबांचे नकली पूत्र असा केला होता. याचाही समाचार संजय राऊत यांनी घेतला. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना जर नकली संतान कुणी बोलत असेल तर हा महाराष्ट्राचा अवमान आहे. संपूर्ण महाराष्ट्र मीनाताई ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानतो. या दोघांच्या बाबतीत अत्यंत दळभद्री विधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

राऊत म्हणाले की, हा प्रश्न फक्त उद्धव ठाकरे यांचा नाही. हा प्रश्न बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. तेलंगणात जाऊन उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणणं हा संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान आहे.

औरंगजेब वक्तव्याबाबत स्पष्टीकरण

संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींविषयी बोलताना केलेल्या टीकेवरून त्यांच्यावर राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केले जात आहेत. यावर संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं. मी कोणालाही औंरगजेब म्हणालो नाही. मी औरंगजेबी विकृतीवर बोललो होतो. तसंच जे महाराष्ट्रावर चाल करुन येतील, त्यांना गाडू. हे कोणाला व्यक्तीगत बोललेलो नाही, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

(हेही वाचा: Lok Sabha 2024 : विकासकामांमुळे जनता महायुतीला कौल देणार, मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास)


Edited By- Prajakta Parab