घरमहाराष्ट्रLok Sabha : प्रणिती शिंदेंकडून भीती व्यक्त, तर राम सातपुते म्हणतात, त्या...

Lok Sabha : प्रणिती शिंदेंकडून भीती व्यक्त, तर राम सातपुते म्हणतात, त्या आमच्या भगिनी

Subscribe

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराला सुरुवात झाली असून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि भाजपाचे उमेदवार राम सातपुते हे मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. विरोधक खोटे आरोप करून माझं चारित्र्यहनन करतील, अशी भीती प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली होती. या आरोपांना आता राम सातपुते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Lok Sabha election 2024 Solapur Constituency Praniti Shinde expresses fear Ram Satpute says She is our sister)

हेही वाचा – Loksabha Election 2024 : किरण सामंत यांच्या माघारीनंतर बंधू उदय म्हणतात…, आमचा दावा कायम

- Advertisement -

भाजपकडे काही मुद्दे नसतात, तेव्हा ते काहीतरी घडवतात. मागील निवडणुकीवेळी पुलवामा घडवले, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला होता. यानंतर आता त्यांनी विरोधक खोटे आरोप करून माझं चारित्र्यहनन करतील, असेही म्हटले होते. याचपार्श्वभूमीवर राम सातपुते यांनी म्हटले की, आम्ही संस्कारी असून आमच्यावर असले संस्कार नाहीत, त्या आमच्या भगिनी आहेत, त्यांनी फालतू गोष्टींवर बोलण्यापेक्षा विकासावर बोलावं, मी फक्त विकासावरच बोलत असल्याचं प्रत्युत्तर भाजप उमेदवार राम सातपुतेंनी दिलं आहे.

निवडणुकीची लाईन विकासावरून घसरून तिसरीकडेच जात आहे, असे म्हणत राम सातपुते म्हणाले की, आता आपण फक्त विकासावरच बोलणार आहे. प्रणिती शिंदे यांनीही फक्त विकासावरच बोलावं, असं आव्हान केलं आहे. तसेच फडणवीसांनी सोलापूरला जितकं दिलं तेवढं काँग्रेसनं दिलं का? असा सवाल राम सातपुते यांनी सोलापुरातील केलेल्या कामांचा पाढा वाचला. प्रणिती शिंदे यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नसल्यानं त्या वाटेल तशी वक्तव्य करत असून पुलवामा हल्ल्यावरील आरोप हा तर तमाम शहिदांचा अवमान असल्याचं राम सातपुते यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : भाजपाने वापरून अडगळीत टाकलेली लोकं आपल्याला येऊन भेटतायत – उद्धव ठाकरे

दरम्यान, राम सातपुते यांनी मंगळवारी सकाळपासून पंढरपूर तालुका आणि शहरात गाठीभेटीचा कार्यक्रम केला. यानंतर त्यांनी रात्री उशिरा पंढरपुरातील शहिद मेजर कुणाल गोसावी यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेस वंदन केलं. यावेळी झालेल्या बैठकीत प्रणव परिचारक, नीलराज डोंबे, लेखन चौघुले यांचेसह परिचारक गटाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -