घरमहाराष्ट्रAaditya Thackeray : मोदींची नाही तर ठाकरेंची गॅरंटी महाराष्ट्रात चालते; आदित्य ठाकरेंचा...

Aaditya Thackeray : मोदींची नाही तर ठाकरेंची गॅरंटी महाराष्ट्रात चालते; आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला

Subscribe

महायुतीतील उमेदवार उभं राहायला तयार नाहीत. कारण त्यांना माहीत आहे या महाराष्ट्रात मोदी गॅरंटी नाही, तर ठाकरे गॅरंटी चालते, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

मुंबई : महाविकास आघाडीचे नगर दक्षिण लोकसभा उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ आज अहील्यानगर गांधी मैदान येथे सभा पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठे बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपासह शिंदे गटावर निशाणा साधला. (Lok Sabha Election 2024 Thackeray’s guarantee works in Maharashtra Aditya Thackeray BJP)

सभेला संबोधित आदित्य ठाकरे म्हणाले की, लंके मी तुमच्यासाठी इथे आलो, तुमचं दिल्लीसाठीचं बुकिंग आता करून आलो आहे. निलेश लंके म्हणजे जीवाला जीव देणारा माणूस आहे. कोरोना काळात त्यांनी सर्वसामान्यांना मदत केली. निलेश लंके साधारण कुटुंबातील व्यक्ती असले तरी त्यांनी सहा तालुक्यात आपले अस्तित्त्व निर्माण केले आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच उपस्थित मतदारांना उद्देशून शेतकऱ्यांवर लाठीचार करणारी, अश्रू धुर सोडणारी भाजपा तुम्हाला मान्य आहे का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारला.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 55.29 टक्के मतदान; इतर राज्यांची परिस्थिती काय?

भाजपाच्या 400 पार घोषणेचा समाचार घेताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 400 सोडा 200 ही जागा भाजपाच्या येणार नाहीत. भाजपाचं सरकार परत आलं, तर ते तुमच्या घरात घुसेल. कारण ते घरफोडे आहेत. पण महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्वएकत्र काम करतोय. आमची ताकद जास्त आहे म्हणून विरोधकांमध्ये खेचाखेच सुरू आहे. महायुतीमधील भांडण काही सुटत नाही, त्यांना उमेदवार मिळत नाही. जे आहेत ते देखील उभ राहायला तयार नाहीत. कारण या महाराष्ट्रात मोदी गॅरंटी नाही, तर ठाकरे गॅरंटी चालते. देशात नारे खूप दिले जातात मात्र प्रत्यक्षात परिवर्तनाची एक वेगळी लाट वाहू लागली आहे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

- Advertisement -

चाळीस लोकांनी पुढचा विचार करावा…

आदित्य ठाकरे म्हणाले की, भाऊसाहेब वाकचौरे स्वतःहून उद्धव ठाकरे गटात आले आहेत. त्यांनी गद्दारी नाही केली. ते आता परत येऊन काम करत आहेत. मतभेद विसरून ते परत आले आहेत, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. आज नारायण राणे यांना उमेदवारी मिळाली, त्यामुळे यापुढे चाळीस लोकांनी पुढचा विचार करावा, असा इशाराच आदित्य ठाकरे यांनी दिला.

हेही वाचा – Lok Sabha : राणेंसोबत उमेदवारी अर्ज भरायला गेलेले किरण सामंत म्हणतात, धनुष्यबाण चिन्ह असतं तर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -