घरमहाराष्ट्रLok Sabha 2024: उद्धव ठाकरेंकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कल्याणमधून वैशाली दरेकर...

Lok Sabha 2024: उद्धव ठाकरेंकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कल्याणमधून वैशाली दरेकर मैदानात

Subscribe

उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात कल्याण डोंबिवली, हातकणंगले, जळगाव आणि पालघर या जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. ठाकरे गटाने कल्याण डोंबिवलीत वैशाली दरेकर-राणे यांना लोकसभेच्या रंगणात उतरवलं आहे. मुख्यमंत्री शिंदेंचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या कल्याण-डोंबिवलीत एक महिला उमेदवार उतरवला आहे. पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी ही यादी जाहीर केली आहे. ( Lok Sabha Election 2024 Uddhav Thackeray announces second list of candidates From Kalyan to Vaishali Darekar Rane against Shrikant Shinde)

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत राजू शेट्टी यांच्यासोबत बोलणी फिसकटली नाही. हातकणंगले आणि सांगली आम्ही लढत आहोत. हातकणंगले हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. तिकडेच राजकीय गणित पाहता आम्हाला कार्यकर्त्यांनी विनंती केली की आमचा उमेदवार द्यावा. राजू शेट्टी यांना म्हटलं आम्ही पाठिंबा देऊ तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढवा, त्यांनी नकार दिला, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

- Advertisement -

जळगावातून तिकीट मिळेल अशी अपेक्षा पण..

भाजपाचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे शिवसेना ठाकरे गटात दाखल झाले आहेत. आजच त्यांनी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उन्मेष पाटील यांचं तिकीट भाजपाने कापलं आहे. त्यामुळे उन्मेष पाटील यांनी थेट भाजपाला रामराम ठोकून ठाकरे गटात प्रवेस केला. त्यांना जळगावातून तिकीट मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ठाकरेंनी करण पवार यांना जळगावातून मैदानात उतरवलं आहे.

या चार जागांवर उमेदवार घोषित

  • वैशाली दरेकर-राणे – कल्याण डोंबिवली
  • सत्यजित पाटील – हातकणंगले
  • करण पवार – जळगाव
  • भारती कामडी-पालघर

(हेही वाचा: Lok Sabha 2024: शरद पवारांचे आभार, आमचं स्वप्न पूर्ण केलं; फडणवीसांचा उपरोधिक टोला)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -