घरमहाराष्ट्रLok Sabha Election 2024: वंचितचा काँग्रेसला कोल्हापूर, नागपूर तर बारामतीत सुप्रिया सुळेंना...

Lok Sabha Election 2024: वंचितचा काँग्रेसला कोल्हापूर, नागपूर तर बारामतीत सुप्रिया सुळेंना पाठिंबा

Subscribe

वंचितने महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी केलेली नसली तरी त्यांनी आतापर्यंत काँग्रेसला दोन तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एका ठिकाणी पाठिंबा जाहीर केला आहे.

पुणे : वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या तिसऱ्या यादीतून नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि शिरूर लोकसभेच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे पुणे लोकसभेतून वंचितने वसंत मोरे यांच्या गळ्यात लोकसभेची माळ घातल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, वंचितने बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. (Lok Sabha Election 2024: Vanchit supports Congress in Kolhapur, Nagpur and Supriya Sule in Baramati)

हेही वाचा… Breaking News : वंचितकडून वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी, तिसऱ्या यादीतून घोषणा

- Advertisement -

वंचितने महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी केलेली नसली तरी त्यांनी आतापर्यंत काँग्रेसला दोन ठिकाणी पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीने कोल्हापुरात उमेदवार न देता काँग्रेसचे शाहू महाराज यांना पाठिंंबा जाहीर केला आहे. त्याचवेळी नागपुरात भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढणारे काँग्रेसचे विकास ठाकरे यांनाही पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता त्यांनी आज बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार असलेल्या मविआच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पण त्यांची ही खेळी अनेकांच्या पचनी न पडणारी असल्याचेच पाहायला मिळत आहे.

मागील दोन महिन्यांपासून वंचित आणि मविआ एकत्र लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा रंगली होती. यावेळी अनेक राजकीय घडामोडीही घडल्या. यामध्ये बहुतेक वेळा नाराजीनाट्य देखील पाहायला मिळाले. पण वंचित आणि मविआमधील जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला अंतिम होत नसल्याने अखेरीस वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत असलेली युती तोडण्याचा देखील निर्णय जाहीर केला. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. पण तरी देखील मविआला तीन जागांवर वंचितकडून पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… VBA Lok Sabha Candidates : अखेर वसंत मोरेंच्या गळ्यात वंचितकडून पडली उमेदवारीची माळ

खासदार सुप्रिया सुळेंनी मानले वंचितचे आभार

वंचितने बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता मविआच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले आहेत. “बारामती लोकसभा मतदारसंघातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने माझ्याविरुद्ध उमेदवार न देण्याची भूमिका घेत पाठिंबा जाहिर केला आहे. याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा. प्रकाशजी आंबेडकर यांचे मनापासून आभार मानते. आपण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात ही माझ्यासाठी अतिशय मोलाची बाब आहे. संविधानाच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी आपण सदैव एकत्रित काम करु ही ग्वाही देते. पुन्हा एकदा धन्यवाद.” असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी X या सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -