घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड थेट दिल्लीत, पक्षश्रेष्ठींची घेणार...

Lok Sabha 2024 : काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड थेट दिल्लीत, पक्षश्रेष्ठींची घेणार भेट

Subscribe

काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्यासोबत आमदार अमिन पटेल आणि आमदार अस्लम शेख हे देखील दिल्लीला पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीचे जागावाटप करण्यात आले आहे. पण यामुळे काँग्रेसच्या गोटात मात्र नाराजी पसरली असल्याचे चित्र पाहायला मिळाला आहे. सांगली, भिवंडी आणि मुंबईतील एका जागेवरून काँग्रेसमधील जुने नेते नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. मविआचे जागा वाटप जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली होती. पण मी नाराज नाही, असेही त्यांच्याकडून लगेच सांगण्यात आले. पण आता याच जागावाटपावर चर्चा करण्यासाठी त्या दिल्लीला गेल्या असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत त्या काँग्रेस हायकमांडची भेट घेणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. (Lok Sabha Election 2024 Varsha Gaikwad going Delhi to meet Congress leaders)

काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्यासोबत आमदार अमिन पटेल आणि आमदार अस्लम शेख हे देखील दिल्लीला पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे. दोनच दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील जागावाटप करताना विश्वासात घेतले नाही, असे म्हटले. ज्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. पण, मी नाराज नाही, असेही त्यांच्याकडून नंतर सांगण्यात आले. जिथे पक्षाची ताकत आहे, ती जागा आपल्या पक्षाला मिळाली पाहिजे असे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटत असते आणि त्यात काहीही चुकीचे नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी त्या नाराज असल्याच्या चर्चांवर दिले होते.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : हे मोदींचे नाही तर, अदानींचे सरकार; कॉंग्रेस नेता राहुल गांधींचा हल्लाबोल

मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड या मुंबईतील लोकसभेचा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी आग्रही होत्या. पण मविआच्या जागावाटपावेळी हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. तसेच, उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई यांनी उमेदवारी जाहीर केली. त्यावरून वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी त्या दिल्लीला जाणार, असे सांगण्यात येत होते. त्यामुळे याचबाबत चर्चा करण्यासाठी त्या दिल्लीला गेल्या आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

- Advertisement -

त्यामुळे आता दिल्लीला गेलेल्या वर्षा गायकवाड, अमिन पटेल आणि अस्लम शेख यांच्या दिल्लीवारीचे नेमके कारण काय? याबाबत सध्या तरी अनेक तर्क वितर्क लढविले जात आहेत. पण नाराज नाही, असे सांगणाऱ्या काँग्रेस मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची नाराजी उघडपणे समोर आलेली आहे. ज्यामुळे आता स्वतः त्याच याबाबत काही माहिती देतात की नाही, यांकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -